अन्यथा प्रहार स्टाईलने अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा
हिमायतनगर,अनिल मादसवार | तालुक्यातील नदीकाठावर असलेल्या मौजे दिघी येथील रेती घाटावरून याचा गावातील ५ ते १० ट्रैक्टर चालक मालकांनी नदीतील पाणी कमी होताच दसऱ्यापासून दररोज शेकडो ब्रास रेतीचा अवैद्यपणे उपास करून शासन व जनतेच्या डोळ्या धूळ फेक केली आहे. काही तक्रारीनंतर शेवटच्या टप्प्यात रतिसाठे जप्त केले. मात्र यातही येथे आलेल्या अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी मोठ्या साठ्यांना छुट दिली. आता जप्त केलेल्या साठ्यातूनही रेती चोरीची मुभा दिल्यामुळे कि काय गावात सुरु असलेल्या रस्ते बांधकामासाठी जप्त साठ्यातील रेती चोरून नेऊन चक्क येथील सरपंचाच्या संगनमताने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. यास जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करावी अन्यथा प्रहार स्टाईलने अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या दिघी येथील रेती धक्क्यावरून राजकीय वरद हस्त असलेल्या ५ ते १० ट्रैक्टर चालक - मालकांनी महसुलाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठ्यासह सरपंच व इतर गावातील काही लोकांना हाताशी धरून दसऱ्यापासून म्हणजे ५ महिन्यापासून रात्रंदिवस रेतीचे उत्खनन करून लाखो ब्रास रेती चोरून विक्री केली आहे. एवढंच नाहीतर पावसाळा तोंडावर आल्याने हजारो ब्रास रेतीची साठेबाजी करून सुरक्षित ठिकाणी ताडपत्र्यास इतर साहित्य टाकून झाकून ठेवली आहे. आणि आता याचा साठ्यातील रेती गरजूना अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून मालामाल होण्याचा प्रयत्न सुरु आहे.
केवळ महसूलच्या संगनमतामुळे रेतीचा कधी नव्हे तेवढा अमाप उपसा यावर्षी ट्रैक्टर, टिप्पर चालक - मालकाने ठिकठिकाणी मनुष्यबळ तैनात करून केला यासाठी गावातील काही जणांना हाताशी धरून त्यांना खुश करून कोणी या भागाकडे येतेय का याचा खबऱ्या म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी फिरणे आले, तर स्थानिक गरजू घरकुल धारकांना ४ ते ५ हजार रुपये ब्रासने रेती विकत ग्यावी लागली आहे. जर कुणी गरजू स्वतःच्या वाहनाने रेती आणत असला तर त्याची माहिती मंडळ अधिकाऱ्यांना देऊन आपल्याशिवार कुणीही रेती अनु नये याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे.
हा चोरीचा गोरखधंदा राजरोसपणे चालू असल्याची माहिती संबंधित विभागास निवेदनाद्वारे, फोनद्वारे लेखी व तोंडी तक्रारी द्वारे दिली. मात्र याकडे दुर्लक्ष करून आपल्या हप्त्याच्या रक्कमेत आणखीनच वाढ करून घेऊन रेती चोरांना रान मोकळे सोडले आहे. त्यामुळे येथील रेती घाटाच्या तक्रारी आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर उपजिल्हाधिकारी यांनी तहसीलदार याना कार्यवाही संदर्भात वारंवार सूचना देऊनही अल्पश्या साठ्याचीच जप्तीचा फार्स करून पुन्हा जपत केलेल्या रेती साठ्याला चोरून नेण्याची मुभा दिल्यामुळे कि काय जप्त साठ्यातील रेती गावात सुरु असलेल्या रास्ता कामासाठी वापरली जात आहे.
रेतीसाठा जपत केल्यानंतर महसूल विभागाने गावात दक्षता समिती गठीत केली, आणि येथील अल्प म्हणजे ६० ब्रास व ३५ ब्रास जप्त केलेल्या साठ्याची जबाबदारी सरपंच म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाकडे दिली होती. तरीदेखील गावातील रस्त्याच्या कामासाठी आता जप्त केलेली रेती चोरून नेऊन वापर केला जात आहे. जप्त केलेल्या रेती साठ्याचा कुठलाही लिलाव झालेला नसताना रेती चोरांनी गावातील काही लोकांच्या संगनमताने रेती साठा चोरून नेला आहे. या प्रकारची चौकशी करून दोन दिवसात कार्यवाही करावी. अन्यथा महसूल व रेती चोराच्या विरीधात तहसील कार्यालयांसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुका प्रमुख विद्यानंद देवसरकर यांनी दिला आहे, यासोबत त्यांनी रेती चोरून नेतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल केल्याने खाबुगिरीने बरबटलेल्या महसूल प्रशासनाचे अधिकारी रेतीचोरीत सामील असल्यावर कार्यवाही करतील कि प्रकार अंगलट येऊ नये म्हणून दडपून टाकतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.