नांदेड| लॉयन्सच्या डब्याची किर्ती हळू हळू जगभर पसरू लागली असून, इंग्लंड अमेरिका ओमान या देशानंतर आता कॅनडा मधील गुरुसिमरन कौर पुआर यांनी तीनशे जेवणाचे डबे देऊन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी सुरू केलेल्या अन्नदान चळवळीत आपले योगदान दिले आहे.
मूळच्या पंजाबमधील रहिवासी असलेल्या गुरुसिमरन कौर पुआर ह्या सुखजित कौर आणि दलजित सिंग या आई वडिलांसोबत तसेच भाऊ बिक्रमजितसिंग आणि रमिंदरसिंग यांच्यासोबत सध्या टोराटो कॅनडा येथे राहतात.मूळचे नांदेड निवासी व सध्या इंग्लंडमध्ये स्थाईक झालेले रंगनाथ देशपांडे यांच्या त्या सहकारी आहेत. रंगनाथ देशपांडे यांनी यापूर्वी लॉयन्सच्या डब्याला भरभरून मदत केली होती.
सोशल मिडिया च्या माध्यमातून गुरु सिमरन कौर यांना ची माहिती समजली.नांदेडशी काहीच संबंध नाही तरी फक्त माणुसकी म्हणून गुरुसिमरन कौर यांनी अन्नदान करण्याची इच्छा रंगनाथ देशपांडे यांच्याकडे व्यक्त केली. देशपांडे यांनी दिलीप ठाकूर व गुरुसिमरन कौर यांची चर्चा घडवून आणली. त्यातून शुक्रवार दिनांक 4 जून रोजी गुरुसिमरन कौर यांच्या तर्फे नांदेड़ मधील गरजूंना जेवणाचे ३०० डबे देण्यात आले.
त्यासोबतच कै.ओमप्रकाश विश्वनाथ आनंतवार यांच्या स्मरणार्थ प्रज्योत ओमप्रकाश अनंतवार यांच्यातर्फे १०१पूर्ण गोड जेवण व विजयकुमार रेखला यांच्यातर्फे १५ पूर्ण गोड जेवण,सौ शीला व लक्ष्मणजी साबू औरंगाबाद यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त डॉ. राजेंद्र मुंदडा यांच्यातर्फे १०० डबे शुक्रवारी वितरित करण्यात आले. हे डबे वितरण करण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्या समवेत अरुण काबरा,सुरेश शर्मा,कामाजी कदम,मन्मथ स्वामी,राजेशसिंह ठाकूर,विशाल धुतमल यांनी परिश्रम घेतले.
अनिवासी भारतीय असलेले रंगनाथ देशपांडे यांची मातृभूमीची ओढ कमी झाली नसून त्यांनी जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्याचे दिलीप ठाकूर यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.गुरुसिमरन कौर तसेच रंगनाथ देशपांडे यांचे लॉयन्स परिवाराने आभार व्यक्त केले आहे.