पैनगंगा नदीपात्राला पोखर्णाऱ्यावर कार्यवाही होईल काय...?
मुंबई| गौण खनिजाचे अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मुंबई येथील मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तिन्ही जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.बांधकाम व्यावसायिकांची तपासणी करा..!
मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी किती गौण खनिज वापरले, किती बाहेर विकले, यासंदर्भात तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.
कोट्यवधींचा महसूल बुडतोय
गौण खनिजाच्या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतोय. महसूल यंत्रणेने योग्य वसुली केली तर राज्याच्या तिजोरीत काही प्रमाणात का होईना हातभार लागेल. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईचे करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.
रिक्त पदांना लवकरच मंजुरी
मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात महसूल विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. तसेच काही ठिकाणी पदे ही मंजूर नाहीत. या ठिकाणी तात्काळ पदे मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले. तसेच करमणूक कर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी महसूल विभागाकडे वर्ग करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव पाठवून कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
पैनगंगा नदीपात्राला पोखरून अधिकारी माफिया झालेत मालामाल
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्राला राजकीय वरद हस्त असलेल्या रेती माफियांनी पोखरून टाकले आहे. त्यामुळं पर्यावरण धोक्यात आलं असून, या प्रकाराकडे स्थानिक तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे राष्ट्रांदिवस शेकडो ट्रैक्टर, टिप्पर, आदी वाहनाच्या साहाय्याने गरजूना रेतीची विक्री करून शासनाचा महसूल बुडविल्या जात आहे. असे असतानाही खाबुगिरीची सवय जडलेले अधिकारी आपल्या स्वार्थापोटी या रेती माफियांना अभय देत असल्याच्या असंख्य तक्रारी होत असताना केवळ जप्ती व कार्यवाहीचा फार्स करून हजारो ब्रास रेती चोरणार्यांना अभय देऊन अधिकारी - माफिया मालामाल होत असल्याचा आरोप कट्टर शिवसैनिक रामभाऊ गुंडेकर यांनी केवळ असून, याबाबत त्यांनी खासदार हेमंत पाटील याना अवगत करून देत दि.२७ में पासून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनातून सांगितले आहे.