महाराष्ट्र संघर्ष समिती आणि मुप्टा यांनी दिलेल्या वेगवेगळ्या निवेदनानुसार मुळात प्राध्यापक नसलेल्या डॉ.दिपक बच्चेवार यांची निवड प्रभारी सहयोगी अधिष्ठाता म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात करण्यात आलेली आहे. ती निवड बेकायदेशीर आहे. कुठल्या तरी दबावाखाली किंवा व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत म्हणून त्यांना खुश करण्यासाठी हे पद बहाल करण्यात आले आहे. डॉ.दिपक बच्चेवार यांची पदस्थापना फिजिक्ल डायरेक्टर ही आहे. ते प्रशिक्षक असतांना ते एकमेव विद्यवान शिक्षक विद्यापीठ परिक्षेत्रात आहेत असा समज विद्यापीठ प्रशासनाने केला आहे काय असा प्रश्न विचारला आहे. मराठा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.मनीष वडजे यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली आहे. मुप्टाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनावर सचिव डॉ.गोविंद रामदिनेवाड यांची स्वाक्षरी आहे. सहाय्यक अधिष्ठाता पदावर प्राध्यापकाऐवजी सहयोगी प्राध्यापकाची निवड केली सोबतच अनुसूचित जाती जमातीच्या प्राध्यापकांना सहाय्यक अधिष्ठातापदी नेमणूक देवून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सोबतच अधिष्ठाता पदावर नेमणूकीसाठी असलेल्या विद्यापीठ कायद्याचे कलम 15 जोडण्यात आले आहे.
नांदेड| नियम बाह्यपणे नियुक्ती करण्यात आलेल्या सहयोगी अधिष्ठाता दिपक बच्चेवार यांची अवैध निवड महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टिचर्स असोसिएशन मुप्टा आणि मराठा संघर्ष समितीने रद्द करण्याची मागणी राज्यपाल आणि कुलपती यांच्याकडे केली आहे.