कु. अंकिता कंधारे - अनार्य कुर्तडीकर यांचे शालांत परिक्षेत नेत्रदिपक यश

नांदेड|
कु.अंकिता भगवान कंधारे हिने शालांत परिक्षेत नेत्रदिपक यश मिळविले असून तिने ९६ टक्के गुण प्राप्त केले आहेत. नांदेड येथील कमला नेहरू विद्यालयाची विद्यार्थीनी असलेल्या अंकिता कंधारे हिने नुकत्याच घोषित झालेल्या दहावीच्या निकालात ९६ टक्के गुण प्राप्त केले असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

विवेकानंद नगर येथे वास्तव्यास असलेल्या आंबेडकर चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळाचे संचालक व रिपब्लिकन सेनेचे उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भगवान कंधारे यांची ती कन्या आहे. अभ्यासात हुशार असलेल्या अंकिता हिला भविष्यात आयकर अधिकारी व्हायचे असल्याचे तिने प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अंकिताने तिच्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक वृंद व आई-वडिलास दिले आहे.

अनार्य कुर्तडीकर याचे शालांत परिक्षेत नेत्रदिपक यश

अनार्य कुर्तडीकर याने शालांत परिक्षेत नेत्रदिपक यश मिळविले असून तिने ८६ टक्के गुण प्राप्त केले आहेत. नांदेड येथील टायनी एंजल्स विद्यालयाचा  विद्यार्थी असलेल्या अनार्य कुर्तडीकर याने नुकत्याच घोषित झालेल्या दहावीच्या निकालात ८६ टक्के गुण प्राप्त केले असून त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

आंबेडकर चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते  रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव कुमार कुर्तडीकर यांचे तो चिरंजिव आहे. अभ्यासात हुशार असलेल्या अनार्य कुर्तडीकर याने भविष्यात अभियंता होण्याचे आपले लक्ष असल्याचे प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याची कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनार्यने त्याच्या  यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक वृंद व आई-वडिलास दिले आहे.

अलोक पुंडगेचे यश

 नांदेड येथील महात्मा  फुले हायस्कुल नाईक नगरचा विद्यार्थी अलोक महेंद्र पुंडगे याने इयत्ता दहावीच्या परिक्षेत 87.40 टक्के  घेवून घवघवीत यश संपादीत केले. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी