किनवटच्या एसव्हीएम भागातील एक डॉक्टर व एक संस्थाचालक पॉझिटिव्ह

कोरोना बाधित वृद्धेच्या मृत्यूमुळे मोमीनपुरा कंटेनमेंट झोन जाहीर

किनवट| शहराच्या सरस्वती विद्या मंदिर भागात यापूर्वी एक तरुण कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर मंगळवारी ( दि.28) रात्री उशिरा याच परिसरातील रहिवाशी असलेले एक निवृत्त पशूवैद्यकीय अधिकारी व सारखणी येथील शैक्षणिक संस्थेच्या एका संस्थाचालकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, शहराच्या मोमीनपुरा भागातील एका वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल मंगळवारी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. त्यानंतर प्रशासनाने मोमीनपुरा भाग कंटेन्मेन्ट,बफर झोन म्हणून जाहीर केला आहे.                                        

शहराच्या एसव्हीएम भागातील एका तरुणाचा अहवाल दि.17 रोजी पॉझिटीव्ह आला होता. मंगळवारी रात्री उशिरा याच भागातील उपरोक्त दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्या दोघांनाही गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्ण आढळलेला भाग त्वरित कंटेन्मेट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तहसीलदार उत्तम कागणे यांनी दिली.  शहराच्या सिद्धार्थनगर भागात तीन तर सरस्वती विद्या मंदिर परिसरात एक रुग्ण कोरोनाबाधित झाल्यानंतर सोमवारी ( दि.27) शहराच्या मोमीनपुरा येथील 70 वर्षीय वृद्धेचा कोरोनामुळे नांदेड येथे मृत्यू झाला. 

याबाबीचा अहवाल मंगळवारी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. त्यानंतर आरोग्य विभागाने मयत वृद्धेच्या परिवारातील दोघांना येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. शिवाय, परिवारातील कांही सदस्यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून मोमीनपुरा भाग मंगळवारी सायंकाळी कंटेन्मेन्ट झोन करण्यात आले. संशयित दोघांसह अन्य कांहीचे स्वॅब मंगळवारी नांदेडच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहिती गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉॅ. उत्तम धुमाळे यांनी दिली. शहरात कोरोनाबाधितांची संख्या आता 5 झाली असून, त्यापैकी एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. प्रारंभी सिद्धार्थनगर, त्यानंतर एसव्हीएम व आता मोमीनपुरा प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाले आहेत.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी