आधार कार्ड केंद्र सुरू करा-निवेदन

नांदेड|
बंद असलेले आधारकार्ड केंद्र अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू करण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांना देण्यात आले आहे. 

शेख एजाज शेख बाबू, सुनिल प्रभारकर अनंतवार आणि अनिल पवार, यांनी एक निवेदन दिले आहे. त्यात आधार कार्ड केंद्र बंद आहे. आधार केंद्र चालविणाऱ्या चालकांकडे अनेक जण चकरा मारत आहेत कारण आधार कार्डाची गरज ओळखपत्र,  निराधार योजना, शिधा पत्रिका, बॅंक, अंगणवाडी खाऊ वाटप यासाठी आवश्यक आहे. कोरोना-19 साठी दवाखान्यात रुग्णाला भती करतांना सुध्दा आधारकार्ड लागते. या सर्व गरजांसाठी आवश्यकता असतांना हे आधार कार्ड सध्या मिळत नाही आहे. त्यामुळे आधारकार्डकेंद्र आणि ऑनलाईन सुविधा त्वरीत सुरू करावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी