डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ७० वर्षीय महिलेचा मृत्यू, डॉक्टरांविरुध्द अर्ज

नांदेड|
लयात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या  नातलगांनी डॉक्टरांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा अर्ज वजिराबाद पोलीस ठाण्यात दिला आहे. शववाहिणीसह या मयत महिलेचे नातलग पोलीस ठाणे वजिराबाद येथे आले होते. पोलिसांनी मात्र त्यांची समज काढून त्यांना रवाना केले आहे. शेख उस्मान शेख सुलतान यांची सासू खमरुन्नीसा शेख अब्दुल (७०) या मूळ रा.वाशिमच्या असून, त्या आपल्या मुलीकडे हिमायतनगर येथे आल्या होत्या. 

त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नेले तेंव्हा खासगी डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयात नेवून कोरोना टेस्ट करुन या असे सांगितले. त्यामुळे २५ जुलै रोजी खमरुन्नीसा बेगमला शासकीय रुग्णालय नांदेड, महानगरपालिकेच्या समोर भरती केले. २७ जुलै रोजी त्यांची कोरोना टेस्ट नकारार्थी आली. त्यानंतर आरएमओ यांनी खमरुन्नीसा बेगमला सुट्टी देण्यास सांगितले. पण तीन-चार तासाने सांगितले सुट्टी देता येत नाही. वरिष्ठांची परवानगी घेवून नंतर सुट्टी देवू. शेख उस्मान हे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटले पण माझी सासू खमरुन्नीसा बेगम यांना मधुमेह, रक्तदाब आणि दमा हे आजार आहेत, त्यांना कोरोना नाही, त्या आजारांसाठी उपचार करणे आवश्यक असल्याने त्यांना सुट्टी द्या, मी त्यांना पुढील उपचार देतो तरीही त्यांनी ऐकले नाही. 

२७ जुलै रोजी मी जिल्हाधिकारी साहेबांना ऑनलाईन तक्रार केली. वैद्यकीय अधिकाNयांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे त्यांनी माझ्या सासू खमरुन्नीसा बेगम यांना सुट्टी दिली नाही. त्यांना कोरोना नव्हता आणि त्यांच्यावर इतर आजारांचे उपचार आवश्यक होते. आणि काहीही न करता डॉक्टरांनी माझ्या सासूला उपचार न दिल्यामुळे सायंकाळी सहा वाजता माझ्या सासूच्या मृत्यूची फक्त सूचना दिली. आज दि.२९ जुलै रोजी सकाळी शवविच्छेदन करुन शव ताब्यात दिले आहे. माझ्या सासूच्या मृत्यूला शल्यचिकित्सक, अतिरिक्त शल्यचिकित्सक, आरएमओ आणि कर्तव्यावर असणारे डॉक्टर जबाबदार आहेत. या सर्वांच्या निष्काळजी व गैरजबाबदारपणामुळेच माझ्या सासूचा मृत्यू झाला आहे म्हणून सर्वांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हा अर्ज देताना खमरुन्नीसा यांचे शव ठेवलेली शववाहिका वजिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आणून उभी करण्यात आली होती. तेथे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे आणि त्यांच्या सर्व पोलीस सहकाNयांनी शेख उस्मान यांचा अर्ज घेतला आणि त्यांना कायद्यातील सर्व बारकावे समजून सांगितल्याने शेख उस्मान आणि त्यांच्या नातलगांनी खमरुन्नीसा यांचे प्रेत ठेवलेली शववाहिणी घेवून ते आपल्या गावाकडे रवाना झाले आहेत.

.....रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी