प्रवीण पाटील कोरोना पॉझिटिव्ह कार्यकर्त्यांत अस्वस्थता "निरोगी व्हा " यासाठी प्रार्थना

लोहा|
कंधार तालुका जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा "होम ग्राउंड'  चिखलीकर कार्यकर्त्याच्या 'श्वास' कोरोना काळात प्रतापराव पाटील व युवा नेते प्रवीण पाटील यांना काळजी घ्या जास्त फिरू नका असे 'आपुलकी' अधिकारवाणीने कार्यकर्ते सांगायचे काही प्रमाणात त्याचे पालनही झाले. परंतु मुंबईहून वैद्यकीय तपासणीनंतर  नांदेडला आल्यावर प्रवीण पाटील लाळेचा नमुना पॉझिटिव्ह आला  हे समजताच कार्यकर्त्यात व अस्वस्थता पसरली. चिंता वाढली पण एकमेकांना सावरत  सर्वांनी त्यांच्या 'लवकर बरे व्हा...! या शुभकामना व्यक्त केल्या. तर कार्यकर्त्यांनी अभिषेक, पूजाअर्चा करत देवाकडे प्रार्थना.

कोविड१९ वैश्विक महामारीच्या काळात
जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर गेल्या  125 दिवसापासून अहोरात्र जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात गेले व जात  आहेत . कोरोना  काळात लोकांच्या अडीअडचणी सोडवत आहेत  त्यांना मदत करत आहेत.मग ते जिल्ह्यात असो की राज्यात व राज्या बाहेर त्यांच्या समस्येचे निराकरण करतात. " साई -सुभाष' या संकटकालीन काळात लोकांच्या गरजा व त्याच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी नेहमीच  मदतीला धावून येते इतकेच नव्हे तर येथेच आपले काम होते याच विश्वास दृढ झाला त्यामुळे 'साई -सुभाष चे कौटुंबिक ऋणानुबंध तयार झाले. लोहा कंधार तालुका   खा चिखलीकर यांच्यासाठी जिवाभावाचा  या भागात   लोकांना त्यांनी नेहमीच सहकार्य आहे. कोरोना काळात खा प्रतापराव यांच्या प्रमाणेच  प्रवीण पाटील,  प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी   या मतदारसंघात आपले कार्य अविरत सुरू ठेवले आहे.

युवा नेते प्रवीण पाटील यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच कार्यकर्ते अस्वस्थ झाले. चिंता वाढली प्रत्येकजण आपल्या कुटुंबा प्रमाणे आस्थेवाईकपणे विचारपूस करू लागला खा प्रतापराव पाटील यांना भ्रमणध्वनी अनेकांनी संवाद साधला काळजी घ्या प्रवीण पाटील लवकर बरे होतील असा धीर देत होते तसेच सोशल मीडियातून मित्र परिवार कार्यकर्ते यांनी  प्रवीण पाटील यांना  लवकर निरोगी व्हावे यासाठी शुभकामना व्यक्त केली. विरोधी पक्षातील कार्यकर्ते नेत्यांनी पक्ष मतभेद असतील पण मनभेद नाहीत असे म्हणत लवकर सुदृढ व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. अस्वस्थ कार्यकर्त्यांनी तर देवाला साकडे घातले नवस केले. युवा नेते  प्रवीण पाटील बरे व्हावे म्हणून प्रार्थना करत आहे. "साई -सुभाष ' ने अनेक कठीण प्रसंग अनुभवले दुःख झेलले आनंद पाहिला पण गेली तीन दशकं या सगळ्या घडामोडीत। जनसेवेचा वसा अविरतपणे सुरूच आहे. कार्यकर्त्यांचे पाठबळ व हजारो लोकांच्या आशीर्वादामुळे चिखलीकर परिवार कधीच आघाताने, आजाराने खचले नाही. मोठी हिम्मत यावेळी सुद्धा आहे.


कोरोनाचा वाढता संसर्ग पत्नी म्हणून व आई म्हणून सौ प्रतिभाताई प्रतापराव पाटील यांना अस्वस्थ करणारा आहे. तर बहीण म्हणून प्राणिताताई याना व कार्यकत्या साठीही चिंतेचा विषय असतो...खा चिखलीकर हे मतदारसंघात असो की मुंबई - पुणे- दिल्ली येथे गेल्यावर काळजी अधिक वाढते त्यातच जवळच्या कार्यकर्त्यांना कोरोना झाल्याचे कळताच अख्ख कुटुंब काळजीत पडतं. प्रवीण पाटील यांच्या रिपोर्ट नंतर सौ  प्रतिभाताई चिखलीकर व सर्व जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. खा प्रतापराव पाटील यांना काही प्रमाणात धीर आला. प्रवीण पाटील यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार होत आहेत... ते लवकर बरे व्हावेत यासाठी "दवा "सोबतच 'दुवा ' केली जाते आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी