तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगाराने दोन साथीदारांसह भरदिवसा टाकला दरोडा

२९ हजार रोख रक्कम आणि १५ तोळे सोने लुटल्याची माहिती

नांदेड|
आज सकाळी दत्तनगरमध्ये एक सराफी दुकान उघडताच अमरावती तुरुंगातून सुटलेल्य एका गुन्हेगाराने आपल्या दोन साथीदारांसह दरोडा टाकला. या दरोड्यामध्ये १५ तोळे सोने आणि २९ हजार रुपये रोख रक्कम दरोड्यात गेली आहे. दुकानदाराने दरोडेखोरांना ओळखले सुध्दा आहे. यातील एका दरोडेखोरांनी काही वर्षापूर्वी शिवाजीनगरच्या एका पोलिसावर जिवघेणा हल्ला केला होता. कोरोना पाश्र्वभूमीवर तुरुंगातील आरोपींना सोडण्याची सुरुवात झाली आणि त्यातूनच हा आरोपी सुटला होता.

दत्तनगरमधील अंकुर हॉस्पिटलच्या मागे स्वामी समर्थ नावाचे सराफा दुकान आहे. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुकनाचे मालक मुक्तेश्वर शंकरराव शहाणे यांनी दुकान उघडले. त्याचवेळी मोटारसायकलवर तीन जण आले आणि त्यांनी मुक्तेश्वर शहाणेला चावूâने जबर मारहाण करुन त्यांच्याकडील १५ तोळे सोने आणि २९ हजार रुपये रोख रक्कम लुटून नेली. घटनेची माहिती वाNयासारखी गावभर पसरली तेंव्हा पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के, पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, आनंदा नरुटे यांच्यासह असंख्य पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर पोहंचले. या प्रकरणात पोलिसांनी त्वरित प्रभावाने पोलीस पथके वेगवेगळ्या भागात रवाना केली आहेत. जखमी असलेल्या मुक्तेश्वर शहाणे यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठविले. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला नव्हता. पण झालेल्या घटनेने दत्तनगरमध्ये नांदेड शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.


या प्रकरणातील मुख्य आरोपी वीरसिंघ उर्फ वीरा बसरुसिंघ सरदार हा आहे. याने काही दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील एका पोलिसावर जिवघेणा हल्ला केला होता. आणि तो अनेक गुन्ह्यांमध्ये तुरुंगवासात होता. कोरोना पाश्र्वभूमीवर तुरुंगातील गर्दी कमी करण्याचा निर्णय झाला आणि त्याच आधारावर वीरा काही दिवसापूर्वी अमरावती तुरुंगातून सुटून आला होता. त्याने आपले साथीदार चिंग्या आणि राम मरीबा देवकर याच्यासोबत मिळून आजचा दरोडा प्रत्यक्षात आणला आहे. पोलीस या आरोपींना त्वरित जेरबंद करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

....रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी