बाजार निर्देशांक लाल रंगात; बीएसईत १.१०% व निफ्टीत ९७.७० अंकांची घसरण

मुंबई|
आजच्या व्यापारी सत्रात गुंतवणुकदारांनी प्रचंड विक्री केल्याने भारतीय शेअर बाजार लाल रंगात स्थिरावला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नोलॉजीज आणि एचडीएफसीसारख्या हेवीवेट स्टॉक्सची जोरदार विक्ररी झाली. त्यामुळे एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने १.१०% चे मूल्य गमावले व ३८,०७१.१३ अंकांवर स्थिरावला. तर निफ्टी ५० ने ९७.७० अंकांची घसरण घेतली व तो ११,२०२.८५ अंकांवर विसावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारात, एनएसईवरील ११ सेक्टरल गेजपैकी ६ सेक्टर्सनी लाल रंगात व्यापार केला. निफ्टी ऑटो इंडेक्स १.२ टक्क्यांनी घसरला. तथापि, पीएसयू बँकेच्या शेअर्समध्ये मोठा फायदा होता, कारण सरकार त्यांना स्टेक विक्री करण्याच्या विचारात आहे. आजच्या व्यापारात निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक १.५ टक्क्यांनी वाढला व त्यांनी १,४१९ अंकांना स्पर्श केला. व्यापक रुपात पहायचे झाल्यास, एसअँडपी बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६८ टक्क्यांनी वाढून १३,७६३ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई स्मॉलकॅपने ०.४ टक्क्यांची वाढ घेत १२,९७२ अंकांवर स्थिरावला.

मारुती सुझुकी: २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीला २६८.३ कोटी रुपयांचा एकत्रित तोटा झाला. त्यामुळे वाहन क्षेत्रातील प्रमुख, मारुती सुझुकी इंडिया (एमएसआयएल) कंपनीचे शेअर्स १.६ टक्क्यांनी घसरले व त्यांनी ६,१८५.६० रुपयांवर व्यापार केला. याच तिमाहीत मागील वर्षी कंपनीला १,३७६.८ कोटी रुपयांचा नफा झाला.

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज: एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीने ५७८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे नोंदवले. त्यानंतर डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज कंपनीचे शेअर्स सर्वाधिक पातळीला म्हणजेच ४,३३४ रुपयांवर पोहोचले. अखेरीस हे शेअर ६.१७ टक्क्यांनी वाढून ४,३००.२० रुपयांवर स्थिरावले.इंडसइंड बँक: कंपनीच्या मंडळाने ३,२८८ कोटी रुपयांच्या निधी उभारणीची योजना मंजूर केल्यानंतर इंडसइंड बँकेचे शेअर्स ४.५४ टक्क्यांनी वाढले. टाटा कॉफी: एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीची मजबूत कामगिरी नोंदवली गेली. परिणामी टाटा कॉफीचे शेअर्स १२.१३ टक्क्यांनी वाढले व त्यांनी सर्वाधिक म्हणजेच ९३ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजारपेठ: कॉर्पोरेट क्षेत्रातील संमिश्र उत्पन्नाच्या अहवालामुळे युरोपियन शेअर्सनी आज अधिक चांगली कामगिरी दर्शवली. तथापि, कोव्हिड-१९ च्या रुग्णवाढीमुळे गुंतवणुकदार आर्थिक स्थितीबद्दल सावध दिसून आले. आशियामध्ये, जपानच्या निक्केई २२५ कंपनीचे शेअर्स गडगडले. येनचे मूल्य वाढत असले तरीही कमाई सत्राची सुरुवात कमकुवत झाल्याने शेअर्स १.१५ टक्क्यांनी घसरून स्थिरावले. एमएससीआय जागतिक इक्विटी निर्देशांक, जो ४९ देशांतील शेअर्सचा मागोवा घेतो, तो ०.१ टक्क्यांनी वाढलेला दिसून आला. आशियामध्ये, जपानच्या निक्केई २२५ कंपनीचे शेअर्स गडगडले. येनचे मूल्य वाढत असले तरीही कमाई सत्राची सुरुवात कमकुवत झाल्याने शेअर्स १.१५ टक्क्यांनी घसरून स्थिरावले. एमएससीआय जागतिक इक्विटी निर्देशांक, जो ४९ देशांतील शेअर्सचा मागोवा घेतो, तो ०.१ टक्क्यांनी वाढलेला दिसून आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी