फुलेनगरच्या लाईट डिपिला आग; रहिवासीयांना कायमच लाईटचा त्रास

हिमायतनगर|
काल सायंकाळी फुले नगर येथील एक डीपीला आग लागल्याची घटना घडली असून, या घटनेत कोणतीही जीवित व वित्त हानी झाली नसली तरी यामुळे रावहिवाश्याना खंडित वीज पुरवठायचा सामना करावा लागत आहे. याकडे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पंडित राठोड यांनी लक्ष देऊन फुले नागरवासियांची कायम समस्या सोडवावी अशी मागणी केली जात आहे. 

शहरातील वॉर्ड क्र. 17 मधील फुलेनगर हे 120 घरांची वस्ती असून येथील लोकसंख्या 4 ते 500 आहे. फुलेनगर हे टेंबी रोडवर रेल्वेस्टेशनच्या दक्षिण बाजू 1 km अंतरावर आहे आणि शहरातून 2 ते 3 km वर हे वस्ती आहे. येथे राहणाऱ्या सर्व नागरिकांना लाईटचा कायमचा त्रास सहन कराव लागते आहे. दरमहिन्यातून किमान 5 ते 6 दिवस तरी अंधारात रात्रभर राहाव लागते फुलेनगर हे सर्व जंगलाचा एरिया असून, नगरपंचायत हिमायतनगरच्या वार्ड क्र.१७ शहरी भागात आहे. असे असताना देखील येथे लाईट मात्र ग्रामीण भागेतून एका खेडेगावातून पुरवठा केली जाते.

यामुळे येथील वस्तीतील नागरिकांना दिवसागणिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे  महावितरण असून अडचण नसून खोळंबा असे म्हणण्याची वेळ येत आहे. फुलेनगरच्या डि.पी.तीन पायलीची बसविले आहे, मात्र डीपीवरील दोन पाइली बेकार निकामी झालेले आहे. वीजपुरवठा एका पाइलीतुन जोडले गेल्याने पुरवठा होणारी वीज कमी दाबाची असते. त्यामुळे डीपीवर लोड येऊन दि. २८  रोजी सायंकाळी ७ वा अचानक डीपीवरील मधील पायलीला अचानक आग लागली. आगीचे लोट जमिनीवर सुद्धा पडले, त्यामुळे खालील अर्थिंगला सुद्धा आग लागून नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर येथील नागरिकांना रात्रीला अंधाराचा  सामना करावा लागला आहे. हि बाब लक्षात घेता येथील वीज पुरवठ्याचा कायम प्रश्न सोडवावा अशी मागणी फुले नागरवासियांनी केली आहे.

...असद मौलाना, हिमायतनगर, जी.नांदेड.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी