शेतकरी, शेतमजूरांचा साप चाऊन मृत्यूला आपत्कालीन घटनेत सामील करा

नांदेड|
शेतकरी व शेतमजूरांचा साप चाऊन मृत्यू झाल्यास यांना आपत्कालीन घटनेमध्ये सामाविस्ट करा अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांनी एक निदेवदानाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

शेतकरी व शेतमजूरांचा साप चाऊन मृत्यू झाल्यास यांना आपत्कालीन घटनेमध्ये सामाविस्ट केल्यास शेतकरी व शेतमजूर यांचा कुटुंबाला फार मोठा आधार होईल. जसे कि, वीज पडणे, पुरात वाहून जाणे, हे आपत्कालीन व्यवस्थमध्ये येतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला 4 लक्ष रु. तात्काळ मदत केली जाते. त्या प्रमाणे शेतकरी व शेतमजूर हा रात्रंदिवस अंधारामध्ये व वाढलेल्या पिकामध्ये काम करत असतो. अशा परिस्थिती साप चाऊन मृत्यू झालेल्या बऱ्याच घटना घडत असतात. अशा परिस्थिती त्यांच्या कुटुंबावर फार मोठे संकट उभे राहते जर आपल्याकडून आपत्कालीन व्यवस्थेत सामाविस्ट केल्यास पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयास फार मोठी मदत होईल. 

आपण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आहात आपणास शेतकरी व शेतमजूर यांच्या विषयी आदर आहे. मी सुद्धा आपल्यासोबत जिल्हप्रमुख असताना वेळोवेळी बैठकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विषयीची तळमळ जवळून बघीतली आहे. हा आपला निर्णय शेतकरी व शेतमजूर बांधवांसाठी ऐतिहासिक राहील आणि जोपर्यंत शेतकरी व शेतमजूर आहे तोपर्यंत आठवणीत राहणारा विषय आहे. असेही निवेदनात म्हंटले आहे. 

...अनिल मादसवार, नांदेड.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी