नांदेड| कु.अंजली प्रकाश पोवाडे हिने शालांत परिक्षेत नेत्रदिपक यश मिळविले असून तिने ९२ टक्के गुण प्राप्त केले आहेत. नांदेड येथील टायनी एंजल्स हायस्कूलची विद्यार्थीनी अंजली प्रकाश पोवाडे हीने नुकत्याच घोषित झालेल्या दहावीच्या निकालात ९२ टक्के गुण प्राप्त केले असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
गणेश नगर येथे वास्तव्यास असलेल्या बिलोली येथिल नगरसेवक तथा पञकार प्रकाश पोवाडे व माजी नगरसेविका सौ.आम्रपाली पोवाडे यांची ती कन्या आहे. अभ्यासात हुशार असलेल्या अंजली हिला भविष्यात पीएसआय अधिकारी व्हायचे असल्याचे तिनेे प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अंजलीने तिच्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षक वृंद व आई-वडिलास दिले आहे.