नांदेड| गेल्या वर्षीची एफआरपी रक्कम अद्याप न दिल्याने भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक ना.अशोक चव्हाण यांच्या घरासमोर सरपंचानां घेवून, लॉकडाऊनचे नियम पाळून आंदोलन करणार असल्याचे प्रसिध्दी पत्रक शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी पाठविले आहे.
न्यायालयाचा आदेश आणि भाऊराव साखर कारखान्याकडे प्रति टन 500 रुपये सोबत विलंब व्याज अशी एफआरपी रक्कम अशी सर्व रक्कम 14 ऑगस्ट पर्यंत दिली नाही तर भोकर तालुक्यातील सर्व सरपंचांसह ना.अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचे प्रसिध्दी पत्रक प्रल्हाद इंगोले यांनी पाठविले आहे.
आंदोलनात सहभागी होणाऱ्या सरपंचांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. भगवान कदम (देगाव), राम कदम (कोंडा), बाळासाहेब देशमुख (बारड), पंडीत कदम (धामदरी), आशाताई बालाजीराव कल्याणकर (पिंपळगाव म.), महेश बुटले (लोण), प्रतिभा रामराव शिंदे (लोण), शहानंद मुदळ (उमरी), विजय जाधव (सावरगाव), सौ.पुष्पाताई बबनराव बारसे (बारसगाव), मारोती पवार(निवघा), एम.डी. अटक(निवघा), राजू धात्रक(शेनी), गजानन नवले (मेंढला), मनोहर बंगाळे (गणपूर), रामरावजी कदम (देगाव), सतिश पाटील बामणीकर (बामणी). आपल्या निवेदनाच्या प्रति पालकमंत्री अशोक चव्हाण, पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी आणि भाऊराव साखर कारखान्याच्या प्रशासनाला दिल्याची माहिती प्रल्हाद इंगोले यांनी दिली आहे.