गुगल न्यूज इनिशीटीव्ह व स्वारातीम विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाच्यावतीने

‘फेक न्यूज पडताळणी’ विषयावर आज वेबिनार
नांदेड|  कोरोनाकाळात दृकश्राव्य माध्यमांसोबत समाजमाध्यमाद्वारे ही नागरिकापर्यंत अनेक प्रकारची माहिती,वृत्त,मते प्रसारित केली जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अनेकदा परस्पर विरोधी विसंगत माहिती प्रसारित होत आहे. त्यामुळे यातील नक्की काय खरे? ते ओळखावे कसे ? हे प्रश्न सतत भेडसावत आहेत. हे लक्षात घेऊन  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुल व गुगल न्यूज इनिशीटीव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने (गुरुवार, 30 जुलै) दुपारी बारा वाजता झुम अॅपवर वेबिनारचे आयोजन केले आहे.



या वेबिनार मध्ये भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील विज्ञान प्रसारचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व फेक न्यूज पडताळणीचे अधिकृत तज्ञ श्री.निमिष कपूर हे मार्गदर्शन करणार आहेत. फेक न्यूज कशी ओळखावी ?  अशा बातमीतील फोटो व व्हिडिओ यांची पडताळणीची कशी करावी ?  ती करण्याची पद्धती काय असते ? याबाबत श्री कपूर ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.

वेबिनारचे उद्घाटन  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे करतील. या वेबिनारमध्ये जनसंवाद व वृत्तपत्रविद्या या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, मुद्रित व इलेक्ट्रोंनिक माध्यमातील पत्रकार यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वेबिनारचे मुख्य समन्वयक माध्यमशास्त्र स्ंकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे व सह-समन्वयक डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. सुहास पाठक, डॉ. सचिन नरंगले, डॉ. कैलाश यादव, प्रा. राहुल पुंडगे, प्रा. प्रीतम लोणेकर, प्रा. अनुजा बोकारे यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी