कै. श्रीधरराव देशमुख  विद्याल्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी

हिमायतनगर|
दहाव्या वर्गाचा निकाल दि. २९ बुधवारी लागला यात तालुक्यातील कै. श्रीधरराव देशमुख  विद्याल्याच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत शाळेचा निकाल दुसर्या क्रमांकावर नेला आहे.

तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात कै. श्रीधरराव देशमुख विद्यालयाची सुरूवाती पासुन गुणवत्तेत आघाडी राहिली आहे, मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत दहाविच्या विद्यार्थ्यांणी बाजी मारली यात शाळेतुन प्रथम येण्याचा मान निकीता गाडेकर हिने ९२.८० टक्के गुण मिळवले, नेहा धोबे ९०.४० टक्के, संदिप देशमुख ८९.२०, गितांजली बंडेवाड ८६.४०, सोनल चेपुरवार ८६.४०, तेजस नरवाडे ८६.६०, यांनी गुणुक्रमे यश संपादन केले.

शाळेतुन एकुण १०३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्या पैकी ९६ उतीर्ण झाले, विशेष प्राविण्यात २४ जणांचा समावेश आहे.  प्रथम श्रेणीत  ३६ आलेत, द्वितीय श्रेणीत ३६ विद्यार्थी आहेत. उतीर्ण विद्यार्थ्यांच शाळेचे अध्यक्ष श्याम देशमुख, मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी, जितेंद्र जाधव, प्रशांत कळसे, गजानन भावडे, रमेश चव्हाण, परमेश्वर राऊतराव, बाबुराव सुरमवाड, रमेश ढेमकेवाड, एस.एल मोरलवार, दिपक कांबळे, मधुकर रावते, संजय कदम, रूपेश शिरफुले, राहुल लोकरे, संभाजी बनसोडे, इल्यास पठाण, यांनी अभिनंदन केले आहे.

विद्यार्थ्यांना दैनंदिन अभ्यासा बरोबर संगित, कला, नाट्य, नृत्य, अशा क्षेत्रात सर्वांगीन विकास होण्याच्या दृष्टीकोनातुन प्रयत्न केले जातात, विद्यार्थी हा पुस्तकी किडा नाही तर, कुठेही चमकला पाहिजे यासाठी शिक्षक प्रयत्न करतात, सुरूवाती पासुन गुणवत्तेत अव्वल राहण्यासाठी मासिक घटक चाचणी घेतली  जाते, यातुन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच मुल्यांकन होते, यंदाही दहाविच्या निकालात विद्यार्थ्यांनी गुणानुक्रमे यश संपादन केले अशी माहिती मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी यांनी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी