आसाम रायफल्समध्ये नोकरी लावतो म्हणून 36 लाखाची

फसवणूक करणाऱ्या एकाला पोलीस कोठडी 

नांदेड| अनेक युवकांना आसाम रायफल्समध्ये नोकरी मिळवून देतो म्हणून प्रत्येकी 4 लाख रुपये घेवून 36 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला लोहा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.के. धोंडगे यांनी 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

हडोळी (ज.) ता.लोहा येथील माजी सैनिक भिमराव किशनराव नागरगोजे यांनी एप्रिल 2020 मध्ये पोलीस ठाणे महाळाकोळी येथे दिलेल्या तक्रारीनुसार मेटीखेडा ता.कळम जि.यवतमाळ याने त्यांचा मुलगा सचिन हा आसाम रायफल्समध्ये भर्ती होण्यास गेला असतांना शारीरिक चाचणीत कमी पडला आणि पुन्हा परत आला. त्यानंतर सचिन नागरगोजेला महेश रमेश कदम रा.मेटीखेडा याचे दररोज फोन येत होत आणि मी इंजिनिअर रेजिमेंटचा कॅपतान आहे आणि वडील सेवानिवृत्त हवालदार आहेत. 

आम्ही तुला आसाम रायफल्समध्ये भर्ती करून देतो त्यासाठी 4 लाख रुपये दे . त्याबाबत 4 लाख रुपये ऑक्टोबर 2017 मध्ये देण्यात आले. आसाम राफलचे नियुक्तीपत्र मिळाले आणि सचिन आसाम रायफल्समध्ये गेला. तो तेथून सैन्याच्या गणवेशातील फोटो पाठवत गेला. याचा विश्र्वास आल्याने माझ्या ओळखीच्या कांही युवकांच्या वडीलांनी प्रत्येकी 4 लाख असे 36 लाख रुपये महेश रमेश कदम त्याचे वडील रमेश कदम, आई रेखा कदम, आणि बहिणी नागरपूरकर यांना दिले. ही सर्व मुले दिलेले नियुक्तीपत्र घेवून आसाम रायफल्समध्ये गेली तेंव्हा हे सर्व नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समजले. तेेंव्हा आम्ही पुन्हा पैसे घेण्यासाठी मेटीखेडा येथे गेलो असतांना महेश रमेश कदम यांनी आमचीही फसवणूक झाली पण तुमचे पैसे आम्ही परत करू असे सांगितले. पण पैसे दिले नाही. 

लोहा पोलीस ठाण्याच्या अशाच एका 5 लाख रुपये फसवणूकीप्रकरणात महेश रमेश कदमला अटक झाली होती. तेथील प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक आश्रुबा घाटे यांनी महेश रमेश कदमला अटक केली आणि आज 30 जुलै रोजी लोहा न्यायालयात हजर केले. लोहा न्यायालयात सरकारी वकील ऍड. गिरीश मोरे यांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्या.पी.के.धोंडगे यांनी आसाम रायफल्समध्ये नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या महेश रमेश कदमला 1 ऑगस्टपर्यंत, दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. 

.........रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी