एनआरआय निवास आणि पंजाब भवन परत द्या

गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांची मागणी 

नांदेड| कोरेाना बाधीत रुग्णांसाठी देण्यात आलेल्या एनआरआय निवास आणि पंजाब भवन या कोविड केअर सेंटरमध्ये तंबाखू, बीडी, गुटखा सेवन होत आहे. जागो-जागी दारुच्या बाटल्या पडलेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही इमारती सचखंड गुरूद्वारा बोर्डाला परत करण्यात याव्यात अशी मागणी गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांनी जिल्हाधिकारी नांदेड आणि मनपा आयुक्तांकडे केली आहे. 

गुरूद्वारा बोर्डाच्या मालकीच्या एनआरआय निवास व पंजाब भवन या दोन इमारती कोरोना बाधीत रुग्णांना ठेवण्यासाठी देण्यात आल्या. या महामारीने जग त्रस्त आहे. तरीपण भाविकांच्या राहण्यासाठी तयार करण्यात आलेलया या इमारती मानवतेच्या दृष्टीकोणातून कोरोना सेवेत देण्यात आल्या. या इमारतींमध्ये शिख समाजामध्ये व्यर्ज असलेल्या अनेक वस्तूंचे सेवन होत आहे. इमारतीमध्ये सर्वत्र थंकून घाण करण्यात आली आहे. तंबाखू, बीडी, गुटखा आणि मद्य सेवन होत आहे. तेंव्हा या सर्व घटना रोष निर्माण करणाऱ्या आहेत. तरी या दोन्ही इमारती पुन्हा बोर्डाच्या स्वाधीन करण्यात याव्यात अशी मागणी बोर्ड अधिक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांनी केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी