उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर सह कंधार तालुक्यातील जनतेच्या विविध विधायक कामे करण्यासाठी ग्रामसंवांद सरपंच संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक तथा उस्माननगर ग्रा.पं.सदस्य सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर काळे यांनी मा.मुख्यमंत्री राज्य सरकार यांना ई- मेलव्दारे तर उपजिल्हाधिकारी उपविभागीय कार्यालय कंधार , आणि मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
या मागणी निवेदनात कंधार तालुक्यातील ग्रा.प. ने दोन वर्षांपासून पंधराव्या वित्त आयोगातून दिव्यांगाना पाच (५ :/.) टक्के निधी अद्याप मिळालेला नाही , तसेच तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेची यादी ग्रा.पं. निहायाती प्रसीध्द झाली आहे .या यादीत प्राधान्याने क्रम देते वेळेस अपंग , विधवा ,गरीब यांना प्राधान्य देऊन घरे द्यावीत .तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की , उस्माननगर सह परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय निमशासकीय कार्यालये आहेत.
या ठिकाणी शासनाच्या वतीने शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून येथे रुजू असलेलें कर्मचारी व अधिकारी येथे मुख्यालयाला न रहाता शहारातून आपडाऊन करण्यात धन्यता मानतात. सरकारला मात्र घरभाडे येथील जोडतात.याठिकाणी दहा ऑफिस आहेत .मोठा कर्मचारी वर्ग आहे.उस्माननगरची लोकसंख्या जवळपास पंधरा हजारांच्या वर आहे.येथून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने कोन्ही मुख्यालयाला न रहाता शहारातून आपडाऊन करतात.
याकडे शासनाने लक्ष द्यावे.तसेच मा.मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समिती कार्यालय कंधार येथील इमारत ही इ.स.१९६३ -६४ मधील असून ति खिळखिळी झाली आहे.जागोजागी भेगा पडल्या आहेत, तालुक्यातील ११६ गावाचा कारभार पाहिला जातो.येथे कर्मचारी जिव मुठीत धरून लोकांचे काम करत असतात.येथे गावागावातून आलेलेल्या सरपंचांना बसण्यासाठी एक सभागृह उभारण्यात यावे.तसेच प्रत्येक पोलिस स्टेशनच्या प्रागणात पोलिस पाटील यांना बसण्यासाठी सुध्दा सभागृह उभारण्यात यावे असे शिवशंकर काळे यांनी निवेदनाव्दारे मागणी केली आहे