नांदेड| दिनांक 15 जून पासून आशा व गट प्रवर्तकांचा राज्यव्यापी बेमुद्दत संप सुरू असून, नांदेड जिल्ह्यात व शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे.
त्या संपाच्या अनुषंगाने दिनांक 17 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर चार तास ठिय्या मांडून धरणे आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार यांनी केले तर आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.द्रोपदा पाटील,कॉ.रेखा धुतडे,कॉ.शरयू कुलकर्णी आदींनी प्रयत्न केले.