नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) त्रिकालज्ञ राभा, (भा.रे.का.से.) यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेडचा पदभार दि. 22 नोव्हेंबर रोजी स्वीकारला आहे. ते भारतीय रेल्वे कार्मिक सेवा चे इ.स. 1987 चे रेल्वे अधिकारी आहेत. या नवीन पदाचा पदभार गृहन करण्यापूर्वी ते अध्यक्ष, रेल्वे भरती बोर्ड, सिलीगुरी येथे कार्यरत होते.
त्रिकालज्ञ राभा मार्च-1989 मध्ये रेल्वे सेवेत सहभागी झाले आणि पूर्वोत्तर
सीमांत रेल्वे मध्ये ते विविध पदावर कार्यरत राहिले. राभा यांनी सहायक कार्मिक अधिकारी आणि विभागीय कार्मिक अधिकारी, तिनसुकिया, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी/ लंबडिंग या पदांवर कार्य केले. ते रेल्वे भरती बोर्ड, गुवाहाटी येथे अध्यक्ष आणि सदस्य सचिव या पदावर कार्यरत होते. तसेच राभा यांनी उपमुख्य कार्मिक अधिकारी, उप महाप्रबंधक (सामान्य), मुख्य जनसंपर्क अधिकारी आणि उपमहा-प्रबंधक तथा सचिव, महाप्रबंधक, आणि मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन), पूर्वोत्तर सीमांत रेल्वे अशी विविध पदे भूषविली आहेत. त्रिकालज्ञ राभा यांनी त्यांचे शालेय आणि विद्यालयीन शिक्षण मुसुरी येथे पूर्ण केले आहे. त्यांनी अर्थशास्त्र या विषयात आपले पद्युत्तर शिक्षण गढवाल युनिवर्सिटी येथे पूर्ण केले आहे. तसेच यांनी टी.आई.एस.एस. मुंबई, आई.एन.एस.ई.ए.डी. (सिंगापोर), आइ.सि.एल.आई.एफ., कौलालंपूर (मलेशिया) आणि आई.एस.बी. हैदराबाद येथे विविध प्रशिक्षण घेतले आहे.