देगलूर येथून विरकर गेले आणि देगलूर रिकामे ठेवले
नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) महाराष्ट्र शासनाने आज 23 नोव्हेंबर 2017 रोजी तीन भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी आणि दोन राज्य सेवेचे अधिकारी अशा पाच अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या जारी केल्या आहेत. त्यात नांदेडच्या देगलूर विभागाचे पोलीस उपअधिक्षक बदलून सांगली शहरात गेले आहेत. पण शासनाने रिकाम्या झालेल्या
देगलूर उपविभागात कोणी पोलीस उपअधिक्षक दिला नाही.
शासनाच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी आज दि.23 नोव्हेंबर 2017 रोजी जारी केलेल्या एका आदेशान्वये कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांना सांगली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक बनविण्यात आले आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांना समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. नागपूरचे समादेशक योगेशकुमार यांना समादेशक राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 12 हिंगोली येथे पाठविण्यात आले आहे. योगेशकुमार नांदेड जिल्ह्यात सुध्दा कार्यरत होते. वरील तीन आयपीएस अधिकाऱ्यांसह राज्य पोलीस सेवेतील डॉ. दिपाली काळे यांना सांगली शहर उपविभागातून बदलून सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर शहर असे स्थानांतरण करण्यात आले आहे. नांदेडच्या देगलूर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक अशोक तानाजी विरकर यांना सांगली शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक या पदावर पाठविण्यात आले आहे. राज्य शासनाने या बदल्या करतांना नांदेडच्या देगलूर उपविभागातील अशोक विरकर यांची बदली केली पण त्यांच्या जागी दुसरा कोणीच पोलीस उपअधिक्षक दिलेला नाही.