काॅग्रेसने पुन्हा एकदा खुपसला राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर
माहुर (सरफराज दोसाणी) माहुर पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे सभापती मारोतराव रेकुलवार यांच्यावर आज दिनांक 23 रोजी पस च्या सभागृहात दुपारी 2 वाजता उपविभागीय महसूल अधिकारी तथा पिठासिन अधिकारी महेश वडपकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत चार विरुद्ध तिन ने अविश्वास प्रस्ताव पारित होउन ते पायउतार झाले आहे.पंचायत समितीचे काँग्रेस सदस्य निलाबाई तुळशीराम राठोड व अनिता विश्वनाथ कदम या दोन काँग्रेसी सह सेनेचे उमेश दुधराम जाधव यांनी अविश्वास ठरावावर मतदान केले.
माहुर तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंस मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रदिप नाईक यांनी स्पष्ट बहुमत असतांना काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन मनाचा मोठेपणा दाखविला होता.परंतु काँग्रेसचे या विभागातील जेष्ठ नेते नामदेवराव केशवे यांनी पुत्रप्रेमा पोटी या पुर्वी नगरपंचायत मध्ये ज्या पद्धतीने या धर्मांध शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षावर अविश्वास आनला होता. त्याच पद्धतीने आज सुद्धा अनुसूचित जमाती साठी राखीव असलेल्या सभापती पदावरील राष्ट्रवादी काँग्रेस च्या मारोतराव रेकुलवार यांच्यावर अविश्वास दिनांक 14 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. नांदेड येथुन अविश्वास ठराव बार्गडावा मणुन काल मतदाना पुर्वी प्रदेश अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण, आमदार अमरनाथ राजुरकर, डिपी सावंत यांना आमदार प्रदिप नाईक यांनी आघाडी धर्माची आठवन करुन देत काँग्रेस पस सदस्यांना ताकीद देण्याचे सांगितले होते. त्यावरुन आ.अमरनाथ राजुरकर व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर यांनी या नाट्यातिल प्रमुख स्थानिक नेत्यांना संपर्क साधून समज दिली होती. परंतु काँग्रेसचे जेष्ठ नेते नामदेवराव केशवे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आनंतराव केशवे व अविश्वास फेम माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे यांनी वरिष्ठ पातळीच्या नेत्यांचे आदेश झुगारून व दोन्ही पस सदस्यांना व्हीप सुद्धा दिले नाही. परीनामी आविश्वास ठरावावर मतदान होऊन ते ठराव मंजूर करण्यात आले.
काँग्रेसला याची किमत चुकवावी लागेल - आ.नाईक
माहुरच्या केशवे काँग्रेसने आज पुन्हा एकदा आमच्या केलेल्या विश्वासघाताची किंमत चुकवावी लागणार असुन पाठीत खंजीर खुपसणार्या मित्रा पेक्षा दिलदार विरोधक बहाद्दर असते अशी खोचक प्रतिक्रीया आमदार प्रदिप नाईक यांनी दिली.ते म्हणाले की, निवडनुकीच्या आखाड्यात दोन हात करुन विजय संपादन करण्याची कुवत नसलेले कमकुवत जनाधार असलले लोक असे अशोभनीय कृत्य करतात. हिम्मत असेल तर विधानसभा निवडणुकीत माझ्याशी दोन हात करुन अनामत रक्कम वाचवुन दाखवावी असे खुल्ले अव्हान आ.नाईक यांनी दिले. आणि या अविश्वासाच्या खेळात अशोक चव्हाण यांचा कसुर नसुन, त्यांना अंधारात ठेवणाऱ्या भिष्मचार्याचां दोष असल्याचे ते म्हणाले. शिवाय काँग्रेस हाय कमांडने लोकसभेत व विधानसभेत केशवेच्या आष्ट्या गावात काँग्रेसला कीती मते मिळाली हे तपासावे असे मत व्यक्त केले.
काँग्रेसचे नेते संपर्क क्षेत्रा बाहेर
माहुर तालुक्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते नामदेवराव केशवे व तालुका काँग्रेस चे अध्यक्ष आनंतराव केशवे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्रा बाहेर आले.