सरसम (साईनाथ धोबे) दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु. येथील भगवान श्रीकृष्ण मंदीरात २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत श्री ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भगवत गीता पारायनाने गीता जयंती महोत्सव साजरी केली जाणार आहे.
सोनखेडकर यांच्या अमृत वाणीतून संगीतमय भागवत कथेचा लाभ मिळणार आहे. दि.२४ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता राजू महाराज यांच्या हस्ते श्री कृष्णाच्या मुर्ती अभिषेक, पुजा व कलशपुजन नंतर माजी सरपंच सुनील वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर रोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ज्ञानेश्वर महाराज व बालाजी महाराज दगडगांवकर करणार आहेत. तर सकाळी ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण व भागवत पारायण व्यासपीठाचार्य हभप. श्री नारायणराव जोशी महाराज सोनखेडकर हे असतील. ज्ञानेश्वरी वाचन हभप शिवाजीराव जाधव वडगावकर करतील. कलशपुजन व अभिषेक श्री अनंत मोतेवार (सपत्नीक) करतील तसेच संगित भागवत नारायण जोशी व संगित साथ हार्मोनियम वादक पुष्पलताबाई पैजने, जयप्रकाश जोशीसह संच आसेल. दि. ३० नोव्हेंबर गुरुवार सकाळी भागवत गीतासह श्रीकृष्ण मुर्तीची पालखी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने निघणार आहे. त्यामुळे गावात संपूर्ण रस्त्यांवर झाडून निर्मळ करून महिला घरासमोर रांगोळी टाकून पालखीचे स्वागत करणार आहेत. शेवटी दि.१ डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी १० ते १२ काल्याचे कीर्तन होणार असून, याप्रसंगी नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगांवकर यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी भागवताचार्य, व्यासपीठाचार्य, परायणार्थी व ग्रंथास येथील प्रसिद्ध व्यापारी रविंद्र दमकोंडवार हे वस्त्रार्पण करतील. यासाठी गीता मंडळ व श्रीराम सत्संग समिती तसेच बजरंग दलसह सरसमची गांवकरी मंडळी सहकार्य करत आहेत.