केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत विविध व्यवसायासाठी प्रशिक्षण

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत सन 2017-18 या वर्षातील केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत  संगणक, ब्युटी पार्लर, फॅशन डिझाईन, मोबाईल दुरुस्ती, ॲटो मोबाईल, टीव्ही, रेडीओ, फेब्रीकेशन, वेल्डींग वर्कशॉप, ड्रॉव्हींग पेंटीग, मोटार रिवायडींग आदी व्यवसायासाठी प्रशिक्षणासाठी शुक्रवार 24 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज करण्याची अंतीम मुदत आहे.


अर्जदार अनु. जाती, नवबौद्ध संवर्गातील असावा. अर्जासोबत शाळा सोडल्याचे मुळ प्रमाणपत्र, तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला शहरी भागासाठी 50 हजार 500 तर ग्रामीण भागासाठी 40 हजार 500 पेक्षा जास्त नसावा. पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे, रॅशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. अधीक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी