सर्पमित्र डी विजयकुमार गुप्ता यांची कामगिरी
बिलोली (शिवराज भायनुरे) माचनुर परिसरात दि 22 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरेस एक मोठ अजगर आढळून आल्यामुळे कधी दिवसा तर कधी रात्रीच्या पाळीत पिकांना पाणी देण्यासाठी जाण्यार्या शेतकर्यांच्या मनात एक भितीच निर्माण झाली आहे या अजगराला डी विजयकुमार यांनी मोठय़ा चतुराईने पकडल्याने येथील नागरीकांने कौतुक केले आहे.
बिलोली तालुक्यातील माचनुर (जुनेगाव ) परिसरात मोठय़ा प्रमाणात काटेरी झूडपे अतिशय वाढल्याने जुनेगाव वोडांळुन पलीकडे शेती असल्याने दररोज जावे लागते अचानक जात असताना कांही शेतकरी यांना सुमारे 10 फुट लांबी व 35 ते 40 कि वजनाचा अजगर आढळून आला. सदरील अजगराची माहिती कुंडलवाडी येथील सर्पमित्र डी विजयकुमार गुप्ता देण्यात आली त्यानंतर सर्पमित्र विजयकुमार गुप्ता यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासत कुठलीच विचार न करता कुंडलवाडी माचनुर या मधला अंतर 10 किमी असुन सुद्धा घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या चालाखीने अजगारास पकडले. याकामी त्यांचा मुलगा आकाश गुप्ता यांची मदत घेवून, हा अजगर पकडण्यात त्यांना यासह आले आहे. या अजगराची लांबी 10 फुट व 35 ते 40 कि असुन हा 'भारतीय अजगर' असल्याची माहिती सर्पमित्र गुप्ता यांनी दिली.
डी विजयकुमार गुप्ता यांनी बिलोली तालुक्यातील शहर परिसरात व खेडयागावात जावुन आजपर्यंत अनेक जातीचे अजगर, नाग अशा अनेक सापांना जिंवतपणे पकडून जंगलात सोडण्यात आले व ह्याही अजगराला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. दि.31 आॅक्टोबर रोजी दोन मोठ्या अजगरांना डॉ विठ्ठल कुडमुलवार व बिलोली व कुंडलवाडी येथील पत्रकार यांच्या उपस्थितीत बाभळी बंधारा परिसरात सोडुन जिवदान देण्यात आल्याचे गुप्ता यांनी नांदेड न्युज लाईव्हशि बोलताना सांगितले. असे सामाजिक कार्य करणाऱ्या सर्पमित्राची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी येथील अनेक नागरिकांनी यावेळी केली.