पार्डी (म) ग्रामपंचायत कार्यालयात मौलाना अबुल कलाम व टिपू सुलतान जयंती साजरी

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद आणि शेर ए हिंद टिपू सुलतान यांची जयंती बुधवारी (22 रोजी) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मारोतराव देशमुख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून
उपसरपंच शेख मौला, माजी सरपंच निळकंठराव मदने, ग्रामपंचायत सदस्य नामदेव कांबळे, शेकुराव हापगुंडे, तानाजी मदने, पत्रकार नागोराव भांगे, सय्यद युनुस, नदाफ युनुस, बाळासाहेब कांबळे, पुंजाराम मदने यांची उपस्थिती होती. प्रारंभी मौलाना अबुल कलाम व टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच सध्याच्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपचांयत कार्यालयास मौलाना अबुल कलाम आझाद आणि टिपू सुलतान यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिर्झा सुलतान, शेख गौस, शेख इरफान, शेख सलमान, मिर्झा चांद बेग, एजाज बेग, शेख शकील, आसिफ नदाफ, शब्बीर नदाफ, शेख समीर, शेख गुलाब, दीपक बेतीवार, बालाजी पाटोळे, शंकर हापगुंडे, शेख सोहेल, शेख मोईन, शेख अफरोज, शेख इमरान यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी