नवीन नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन रोज घरोघरी व्हावे असे मत श्री राम कथाकार ह भ प समाधान महाराज केजकर यांनी मौजे तुप्पा येथे ज्ञानेश्वरी पारायण सांगता प्रसंगी व्यक्त केले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त दि १६ ते २३ नोव्हेंबर पर्यंत मौजे तुप्पा ता जी नांदेड येथे संपन्न होत असून श्री राम कथाकार ह भ प समाधान महाराज शर्मा केजकार यांच्या सुमधुर वाणीतून रामकथेचे आयोजन
करण्यात आले होते. तर २३ नोव्हेंबर रोजी मूर्ती स्थापना, कलशारोहन सोहळा श्री आनंदबानं गुरु गंभीरबान महंत मठ संस्थान तुप्पा व दिगंबर शिवाचार्य वेदान्तचार्य थोरलमठ वसमत यांच्या हस्ते मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता सकाळी १० वाजता ह भ प समाधान महाराज केजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात अली. या परायणाला जेष्ठ नागरिकांसह महिला, युवक, युवती व शालेय विद्यार्थ्यां सहा ३०० जणांनी सहभाग नोंदवून ज्ञानेश्वरी पारायण केले होते. सांगता सोहळा प्रसंगी केजकार महाराज यांनी तुप्पा गावातील भक्तांसाठी ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी नसताना सुद्धा दुसर्याकडून घेऊन परायणाला बसलेल्या भक्तासाठी १०० ज्ञानेश्वरी देण्याचे सांगितले. दररोज २५ ओव्या चे वाचन केल्यास एका वर्षात ज्ञानेश्वरी पूर्ण होत असल्याचे सांगितले.
गावातील जेष्ठापासून ते लहान मुलापर्यंत सहभाग नोंदविल्याने अत्यंत आनंद झाल्याचे सांगितले. अनेक भक्तांनी खेड्यात कथा न करता शहरात करण्याचे सांगितले असता मी स्वतः भक्तांना सांगितले खेड्यात वृक्षाची सावली आणि प्रत्येक घरात माउली असल्यामुळे मी ग्रामीण भागात कथा करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित भक्तांनी टाळ्यांच्या कडकडाट साथ दिली. ज्ञानेश्वरी पारायण सांगता निमित्त महाआरती झाली. जणू गावकर्यांनी यावेळी भक्तिमय वातावरणात मोठा धार्मिक सोहळा उत्साहात संपन्न झाल्याचे दृश्य यावेळी दिसून आले. मंदिरात २३ नोव्हेंबर रोजी कलशा-रोहणासह गणेश, विठ्ठल - रुक्मिणी, महादेव, दत्तात्रय, साईबाबा, तुकाराम, रॅम दरबार, खंडोबा, नामदेव महाराज, संत सेना , मारतळेकर महाराज यांच्या मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून या सोहळ्याचा सांगता समारंभही काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी तुप्पा गावकरी व ग्राम पंचायतचे सरपंच साधना देवराव टिपरसें, उपसरपंच पार्वती कदम , ग्रामपंचात सदस्य, ग्रामसेवक सावंत, तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर कदम यांच्यासह जेष्ठ नागरिक युवक यांनी प्रयत्न केले.