पुस्तकाच्या पानातून या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५७ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या १६ व्या दिवशी धन्वंतरी ऑर्गनायझेशन फॉर सोशियो हेल्थ ट्रान्स फोर्मेशन, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, स्नेहल पुराणिक दिग्दर्शित “ पुस्तकाच्या पानातून “ या नात्य प्रयोगाचे सादरीकरण झाले.

लेखकाच्या भावविश्वातील पात्रांना रंगवणारे हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. यातील पात्र प्रसून ( कार्तिक विश्वमित्रे ) हा एक लेखक, कवी मनाचा असतो
तो आपल्या शब्दांच्या माध्यमातून बावाना जितक्या ठळक मांडू शकतो तितक्याच ठळक पाने तो बोलू शकत नसतो, त्याचे शब्द उच्यार व्यवस्थित करू शकत नसतो, अडखळत असतो. हा त्याचा न्यूनगंडामुळे त्याला आवडणारी त्याची मेत्रीण आश्लेषा ( श्रुती जाधव ) इच्यावर त्याचे प्रेम असते. प्रसुन्चा मित्र माही ( अतुल साळवे ) हा उच्यार, बोलणे व्यवस्थित असले तरी तो शब्दांसोबत खेळू शकत नसतो. प्रसून आपल्या न्यूनगंडामुळे एक नाटक लिहायचे ठरवतो कारण तो त्यातील पात्रांचा निर्माता असतो, ठीथे तो त्यांचा राजा आणि त्याने लिहिलेल्या नाटकातून स्वतःचेच पात्र रंगवतो आणि ते पात्र पुस्तकाच्या पानातून बाहेर निघून संपूर्ण नाटक खेळवतो. या नाटकातील सर्वच पात्रांनी आप आपली भूमिका उत्तम साकारली विशेषतः कार्तिक विश्मित्रे यांनी.


या नाटकाचे नेपथ्य रवी पुराणिक आणि संगीता जाधव यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारले विशेष म्हणजे उघडणारे पुस्तक. या नाटकाची प्रकाश योजना साक्षी घोडजकर आणि अनुष्का पुराणिक यांनी आशयानुरूप साकारले. सौरभ वडजकर आणि श्रध्दा वडजकर यांचे संगीत नाटकास एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. श्वेता विश्वमित्रे व साक्षी ढवळे यांनी या नाटकाचे रंगभूषा व वेशभूषा साकारली तर नाटकातील नृत्यास दिग्दर्शन केले ते श्रुती जाधव यांनी. रंगमंच व्यवस्था महेश कुलकर्णी, मंगेश रत्नपारखी, वनिता विश्वमित्रे, गजानन खळीकर व दीपक गिराम आणि डॉ. गोविंद जवादे यांनी सांभाळले. एकंदर नाट्य स्पर्धेचा शेवट गोड होतोय हे खरे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी