स्वारातीम विद्यापीठ अधिसभेच्या व्यवस्थापन गटाचे सर्व उमेदवार बिनविरोध

नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र शासनाचे एकरूप परिनियम क्र. १ मधील तरतुदीनुसार विद्यापीठ अधिसभेच्या (सिनेट) व्यवस्थापन गटाच्या सहा जागांसाठी फक्त पाचच उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे त्यांना मंगळवार, दि.२१ नोव्हेंबर रोजी बिनविरोध निवडून
आल्याचे जाहीर करण्यात आले असून एक जागा रिक्त राहणार आहे.


अधिसभेच्या व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटामध्ये सर्वसाधारण गटामधून चार उमेदवारांची निवड करावयाची होती. त्यामध्ये गोविंदराव घार, गोविंद कदम, डॉ.साहेबराव मोरे आणि ब्रिजगोपाल तोष्णीवाल या चारच जणांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे त्यांना बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. महिला गटामधून सुनिता चवळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांना बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. अनुसूचित जाती गटामध्ये एकही उमेदवारी अर्ज आला नसल्यामुळे ही एक जागा रिक्त राहणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी