नगराध्यक्ष पदावरून सौ.शोभाताई नळगे पुन्हा पायउतार

नगरविकास राज्य मंत्री रणजित पाटील यांच्या ऐतिहासिक निर्णय

कंधार (सचिन मोरे) शहरातील सर्व जनतेचे लक्ष नगरविकास राज्य मंत्री रणजित पाटील यांच्या निर्णयाकडे लागले होते. नगराध्यक्षा नळगे यांच्या विरोधात एक वेळ फैसला सुनावल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नगरविकास राज्यमंत्री यांनी बुधवारी दि. २२ रोजी सौ. शोभाताई नळगे यांच्या बाबत दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदावरून पायउतारचा निर्णय दिला आहे. या  निर्णयाची वार्ता कंधारमध्ये धडकताच आ.चिखलीकर समर्थकांनी फटाक्यांची अतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. या प्रकरणावरुण आ.चिखलीकर व माजी नगराध्यक्ष अरवींदराव नळगे यांची गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

स्विकृत सदस्य निवडीच्यावेळी  नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी सौ. नळगे यांनी शिवसेनेच्या कृष्णा पापींनवार यांचा प्रस्थाव अयोग्य ठरवला होता. यानंतर पालिका राजकारणात अस्थैर्य निर्माण झाले. सत्ताधारी विरुध्द विरोधक अशी फाईट सुरु झाली. पालीकेतील शिवसेनेचे गटनेता दिपक आवाळे यांनी पापीनवार यांना सोबत घेउन नगराध्यक्षांच्या विरोधात नगरविकास राज्यमंत्र्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन नगरविकास राज्यमंत्र्यांनी सौ. नळगे याना दि.१४ ऑगस्ट रोजी दोषी ठरवले होते. आणि अध्यक्षांचा पदभार उपनगराध्यक्ष महोमद जफरोद्यीन यांच्याकडे सोपवला होता. नगरविकास राज्यमंत्र्यांच्या निर्णयाला श्रीमती नळगे यांनी नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात आवाहन दिले. उच्च न्यायालयात या प्रकरणावर "तारीख पे तारीख" झाल्या.तारीख पे तारीख पडत असल्याने फैसल्याबाबत अत्सुकताही वाढत गेली. जवळपास दोन महिण्यानंतर ता. सहा आक्टोबर रोजी न्यायालयाने सौ. नळगेंना पद बहाल करण्याचा निर्णय देउन सरकारने त्यांचे म्हणणे सविस्तर ऐकूण घेऊन निर्णय देण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार नगरविकास राज्यमंत्र्यांनी 24 ऑक्टोबर पासून सुनावणीची प्रकिर्या सुरू  करून करून 4 नोव्हेंबर पर्यंत संपवण्यात यावी तसेच दि. 24 नोव्हेंबर पूर्वी निर्णय पारीत करावा असे निर्देश न्यायालयाने दिले होते त्याच बरोबर निर्णयाची प्रत प्राप्त करण्यासाठी तारीख व वेळ निश्चित करून त्यावेळी सर्व पक्षकारांना एकाच वेळी द्यावी असे त्यात नमूद करण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णय नुसार नगर विकास राज्य मंत्री डॉ.रणजित पाटील यांनी आपल्या दालनात 31 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेतली होती या सुनावणीत त्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणे ऐकून घेतले व युक्तिवाद पूर्ण झाल्याचा नंतर हे प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवले होते. महाराष्ट्र नगरपरिषदा नगर पंचायती अधिनियम 1965 चे कलम 55- अ व ब तरतुदी नुसार नगराध्यक्ष सौ.शोभाताई नळगे यांना उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरवून अध्यक्ष नगर परिषद कंधार या पदावरून दूर करण्याचा  निर्णय  नगरविकास राज्य मंत्री डॉ.रणजित पाटिल यांनी बुधवारी दि. 22 रोजी दिला. या प्रकरणात तक्रारदार नगरसेवक दीपक आवळे व कृष्णा पापिनवर यांच्याकडून अँड.उमेश मेगदे व अँड.गोविंद करवा तर नगराध्यक्ष सौ.नळगे यांची बाजू अँड.अँड. कोळनूरकर व अँड.मारोती पंढरे यांनी मांडली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी