मुखेड मधील शासकिय कार्यालयातील अपंगाचा 3 टक्के निधी खर्च करावा

प्रा. आडेपवार व दिव्यांगांनी दिले निवेदन
मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) तालुक्यातील अपंग व्यक्ती (समान संधी हक्काचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग) अधिनियम 1995 मधील विहीत कलमान्वये तसेच अपंग कल्याण कृति आराखडान्वये केंद्र शासन आणि राज्यशासन अपंग (दिव्यांगासाठी) विविध कल्याणकारी योजना तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना राबवित असते. पण नगर परिषद मुखेड, पंचायत समिती कार्यालयाकडून अशा कुठल्याच योजनेचा लाभ दिव्यांगांना अद्याप पर्यंत देण्यात आलेला नाही तर  विविध योजनेपासून दिव्यांगांना
वंचित ठेवल्यामुळे तसेच शासन निर्णयीत 3 टक्के राखीव निधी खर्च झालाच नसल्यामुळे हा निधी खर्च करण्यात यावा याबाबत गटविकास अधिकारी व नगर परिषद मुखेड  तसेच तहसिलदार अतुल जटाळे यांना अपक्ष नगरसेवक प्रा. आडेपवार व दिव्यांग आघाडीच्या वतीने दि. 22 नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले. 

दि. 3 डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग (दिव्यांग) दिन म्हणून संपुर्ण जगभरात साजरा केला जातो तर योजनेचा मुखेड तालुक्यात प्रचार व प्रसार करुन 3 टक्के निधी दिव्यांगावर खर्च करण्यात यावा आणि याच दिनी अपंग (दिव्यांगांना) सामाजिक न्याय मिळवून देणा­या दिव्यांग सामाजिक संघटनेच्या दिव्यांगांचा उल्लेखनिय सत्कार करावा जेणे करुन त्यांचा आत्मवि·ाास वाढेल. असे ही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अपक्ष नगरसेवक विनोद नारायण आडेपवार , अपंग आघाडीचे तालुकाध्यक्ष देविदास (पिंटुदादा) बद्देवाड, ज्ञाने·ार तालुका उपाध्यक्ष पाटील बेळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अर्चना चंद्रप्रकाश बियाणी, गजानन सचिव दिगांबरराव इंगोले, शहराध्यक्ष माधव शिरुळे केरुरकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल साळवे आदींच्या स्वाक्ष­या आहेत. मुखेड तालुक्यातील दिव्यांगांनी याअगोदर ही संबंधीत कार्यालयास निवेदन दिले होते व धरणे आंदोलन सुध्दा केले होते पण या बेजबाबदार अधिका­यांना दिव्यांगाची कुठलीच किव होताना दिसून येत नाही तर छोटे मोठे आश्वासन देऊन आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न अधिकारी करत असतात पण अद्याप पर्यंत 3 टक्के राखीव निधी खर्च झालेला नाही. त्यामुळे दिव्यांगाबाबतची अधिका­याबाबत उदासीनता ही दिसून येत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी