स्वारातीम विद्यापीठामध्ये विविध 'उत्कृष्ट' पुरस्काराचे वितरण

नांदेड (एनएनएल) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २३व्या वर्धापण दिनानिमित्ताने विविध पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन आज बुधवार (२०) रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विज्ञान लेखक आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबईचे सचिव डॉ.अनंत पा. देशपांडे, जीवनसाधना गौरव पुरस्काराचे
मानकरी दत्ता भगत आणि डॉ. अशोक कुकडे, प्र. कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि एन. सरोदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

उत्कृष्ट महाविद्यालय शहरी विभागाचा पुरस्कार परभणी येथील गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे बी. रघूनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक सोनी, प्राचार्य डॉ. सोनवणे तर ग्रामीण विभागाचा विभागून देण्यात आलेला पुरस्कार उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे शिवाजी महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष अशोकराव पाटील, प्राचार्य डॉ.ए.एम. पाटील आणि औराद शहाजनी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाचा पुरस्कार प्राचार्य डॉ. अजितसिंग गहिरवार यांनी स्विकारला. उत्कृष्ट प्राचार्य ग्रामीण विभागाचा पुरस्कार चाकूरच्या भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे आणि भोकरच्या दिगंबरराव बिंदू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण यांना विभागून देण्यात आला. उत्कृष्ट शिक्षक शहरी विभागाचा पुरस्कार लातूरच्या बसवेश्वर महाविद्यालयातील डॉ. संजय गवई यांनी तर उत्कृष्ट शिक्षक ग्रामीण विभागाचा पुरस्कार किनवटच्या सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालयातील डॉ मार्तण्ड कुलकर्णी यांनी स्विकारला. विद्यापीठ परिसरातील संकुलीय शिक्षक पुरस्कार भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलातील डॉ भगवान जाधव आणि वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलातील डॉ. वाणी लातूरकर यांना विभागून देण्यात आला.    


स्वारातीम विद्यापीठ परिसरातील आणि संलग्नित महाविद्यालयातील कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देण्यात आला. यामध्ये विद्यापीठ परिसरातील वर्ग एकचा पुरस्कार कार्यकारी अभियंता अरुण पाटील आणि सहाय्यक कुलसचिव रामदास पेद्येवाड यांना विभागून देण्यात आला तर वर्ग दोनचा पुरस्कार सिस्टीम एक्सपर्ट विलास साळवे आणि स्वीय सहाय्यक लक्ष्मीकांत आगलावे यांना विभागून देण्यात आला. वर्ग तीनचा पुरस्कार क.दुरध्वनी चालक मारोती वाघमारे, सहा. अधीक्षक बालासाहेब बोरवंडकर आणि वरिष्ठ लिपिक काळबा हनवते यांना विभागून देण्यात आला तर वर्ग चारचा पुरस्कार बालाजी पांचाळ आणि माधव डोईफोडे यांना विभागून दिला. वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे यांच्याकडून देण्यात येणारा यावर्षीचा लेखा विभागाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार रोखपाल शिवाजीराव हंबर्डे यांना देण्यात आला. संलग्नीत महाविद्यालयातील कार्यरत गुणवंत कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तीनचा पुरस्कार महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरच्या बाबू राठोड आणि दयानंद विधी महाविद्यालय, लातूरच्या दत्तात्रय आळंदकर यांना विभागून देण्यात आला आणि वर्ग चारचा पुरस्कार शिवाजी महाविद्यालय, उदगीरच्या दिलीप जाधव यांना देण्यात आला. यावेळी संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.राजेंद्र गोणारकर यांनी केले तर आभार उपकुलसचिव डॉ. श्रीकांत अंधारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वीय सहाय्यक लक्ष्मीकांत आगलावे, मोहन किरडे, बाळासाहेब कांबळे, माणिक राखोंडे पाटील, शिवाजी चांदणे, कपिल हंबर्डे, आनंद लुटे, जयराम हंबर्डे, अशोक कत्तेवार, बाबाराव हंबर्डे यांच्यासह कुलसचिव आणि शैक्षणिक नियोजन व विकास विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी