NEWS FLASH आता.. ऑनलाईन द्वारे चालणार अंगणवाडी ताईंचे कामकाज, मृग जाऊन आठ दिवस लोटले... पाऊस झाला बेपत्ता, अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या लाभासाठी भावास दिली कोट्यावधीची ठेकेदारी, बुलढाणाचे शाखाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीनंतर निरोप, प्रा.दत्ता मगर याना पीएचडी प्रदान, ..., **

मंगलवार, 8 अगस्त 2017

घोगरे यांच्यावर अज्ञात गुंडाकडून झालेल्या हल्ल्याची चौकशीची मागणी

नविन नांदेड (रमेश ठाकूर) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँगेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांच्यावर दि.06 ऑगस्ट रोजी मालकीच्या असलेल्या हडको येथील प्लॉटवरुन घरी जात असताना पूर्वीपासूनच पाळत ठेवलेल्या अज्ञात 15 ते 20 गुंड येऊन अंधाराचा फायदा घेऊन हल्ला
करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याची चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी सिडको येथील सर्व पक्षीय पदाधिकारी, समाजिक कार्यकर्ते, दलित मित्र व नागरिकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात दि.06 ऑगस्ट 2017 रोजी रात्री 11 च्या सुमारास मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँगेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष जीवन पाटील घोगरे हे आपल्या मालकीच्या बांधकाम सुरु असलेल्या प्लॉटवरुन राहत्या घराकडे पायी जात असताना पूर्वीपासूनच पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात 15 ते 20 गुंड हे मोटर सायकलवर येऊन अंधाराचा फायदा घेऊन अचानकपणे घातपात करण्याच्या हेतूने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु लगेच तेथील उपस्थित असलेल्या बांधकामावरील वॉचमन व इतरांनी आरडाओरड करुन हल्लेखोरांना प्रतिकार केला. तसेच उपस्थित एकाने ग्रामीण पोलीस स्टेशनला फोन लाऊन सदर घटनेची माहिती दिली असता हल्लेखोरांनी जोरदार दगड फेक केली व बांधकामावरील साहित्याची तोडफोड करुन मोटार सायकलवरुन पसार झाले. 

जीवन पाटील घोगरे हे सर्व सुपरिचित व्यक्ती असून सामाजिक व राजकीय जीवनात त्याचा सर्व जाती धर्मात राजकीय सर्व पक्षनेत्यांशी सलोख्याचे संबंध राहिले असून अशा व्यक्तीवरव भ्याड हल्ला होणे म्हणजे सर्वसामान्यांवर हल्ला होय. यापुढे भविष्यात त्यांच्यासह इतरांवरही असे हल्ले होऊ नयेत यासाठी आपण या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी व हल्लेखोरांवर कार्यवाही करावी अशी मागणी दलित मित्र तथा राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते गौतमराव गजभारे, माजी सभापती तथा काँगेसचे नगरसेवक विनय पाटील गिरडे, संभाजी ब्रिगेडचे दक्षिण जिल्हाध्यक्ष संकेत पाटील, यशवंत सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव नाईक, शिवसेनेचे शहर प्रमुख वैजनाथ देशमुख, भाजपाचे सिडको मंडळाध्यक्ष विनोद कांचनगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संतोष देशमुख, ओबीसी सेल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत काकडे, दलित मित्र नारायण कोलंबीकर, शिवसेना उपशहर प्रमुख निवृत्ती जिंकलवाड, दलित मित्र माधव आंबटवार, शाहिर गौतम पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेश रायेवार, माजी नगरसेवक अशोक मोरे, माजी जि.प.सदस्य गजानन चव्हाण, युवक काँग्रेसचे सरचिटणिस राजुभाऊ लांडगे, सिडको काँग्रेस पार्टीचे ब्लॉक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय इंगेवाड, मनसेचे माजी तालूकाध्यक्ष देविदास पाटील तिडके, बबन तरटे, दिपक खैरे, शिवाजी पाटील सुर्यवंशी, उपेंद्र तायडे, शशिकांत पाटील, महेश पाटील शिंदे, राचप्पा स्वामी, मनोहर पाटील कदम यांनी केले आहे.  

सिडको हडको परिसरातील बंद असलेले सीसी टीव्ही कॅमेरे चालू करण्याची मागणी

सिडको हडको परिसरातील बंद असलेले सीसी टीव्ही कॅमेरे चालू करण्याची मागणी माजी सभापती विनय गिरडे, माजी विरोधी पक्ष नेते जीवन पाटील घोगरे व परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. 

जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात सिडको हडको परिसरात दिवसेंदिवस घरफोडी, चो-या, गुंडागर्दी व राजकीय कार्यकर्त्यांवर होत असलेले हल्ले, शालेय मुलींची व महिलांची होत असलेली छेडछेडा पाहता गुन्हेगारावर वचक रहावी व त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी सीसी टीव्हीचे फुटेज हे अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. सद्यस्थितीत या भागातील बसविण्यात आलेले सीसी टीव्ही कॅमेरे हे बंद अवस्थेत असून याचा गैरफायदा गुन्हेगार प्रवृत्तीचे व्यक्ती घेत आहेत. आगामी गणेश उत्सावासह, सण उत्सव या काळातही हे कॅमेरे चालू राहणे आवश्यक असून बंद असलेले कॅमेरे त्वरीत चालू करावे अशी मागणी माजी सभापती विनय पाटील गिरडे, माजी विरोधी पक्ष नेते जीवन पाटील घोगरे, भाजपाचे किसान शहर मोर्चा अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य गजानन चव्हाण, दलित मित्र गौतम दादा गजभारे, दलित मित्र माधव आंबटवार, युवक काँगेसचे सरचिटणिस राजुभाऊ लांडगे, राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे संतोष देशमुख, प्रा.एकनाथ वाघमारे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संकेत पाटील, प्रल्हाद लोखंडे, शाहिर गौतम पवार, दिपक खैरे, आर.जे.वाघमारे, बबन तरटे, राचप्पा स्वामी यांनी केले आहे. 

कोई टिप्पणी नहीं: