सिडको भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष पदी डिगांबर कात्रजकर यांची निवड

नविन नांदेड (एनएनएल) सिडको भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदी डिगांबर कात्रजकर यांची नियुक्ती शहर जिल्हा अध्यक्ष दिलीपसिंघ सोडी यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केले असून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा पक्षात यापूर्वी डिगांबर कात्रजकर यांनी
भाजपा दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष म्हणून कार्य केले होते. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दिलीपसिंघ सोडी यांनी त्यांची सिडको अध्यक्ष पदी नियुक्ती केली. या नियुक्तीचे पत्र भाजपा मध्यवर्ती कार्यालय वजीराबाद येथे महानगर सरचिटणिस संतोष वर्मा, प्रविण साले यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या निवडी बद्दल ऋषीकेश मेड, श्याम नायगावे, आशिष कळसे, दत्ता वरपडे, अनिल तेलंग, अजय चिवटवार, रविराज वाघमारे, साईनाथ गट्टेवार, सोनु जोशी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी