1999 पासून न्यायालयात गैर हजर आरोपीसह दोन जणांना पकडले

नांदेड (एनएनएल) स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी सन 1999 पासून न्यायालयात हजर न राहिलेल्या एका आरोपीसह जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला न्यायालयात हजर केले आहे.

वजिराबाद पोलीस ठाण्यात महिला आणि मुलींसह अनैतिक संबंध ठेवण्याच्या कारणावरून नांदेड येथील प्रभाकर नंदकुमार शेवडकर या व्यक्तीविरुद्ध त्या कायद्यांवये गुन्हा दाखल झाला
होता.त्या नंतर वजिराबाद पोलिसांनी प्रभाकर नंदकुमार शेवडकर विरुद्ध खटला क्रमांक 4589/99 न्यायालयात दाखल केला.त्या पुढे ती कोर्ट कार्यवाही पूर्ण न करताच प्रभाकर नंदकुमार शेवडकर न्यायालयात गैर हजर राहत गेले आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध अटक वारंट जारी झाले.त्यांना पकडून आणण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेवर देण्यात आली.तेव्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले.न्या.महेंद्र सोरते यांनी प्रभाकर नंदकुमार शेवडकरला 1200 रुपये रोख दंड ठोठावला आणि नवीन जामीन घेऊन त्यास सद्यातरी सोडले आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात सत्र खटला क्रमांक 96/2015 मधील जीवे मारण्याचा प्रयत्न असा आरोप असणाऱ्या राजेश नागनाथ वाघमोडे याचे विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.त्यात पोलिसांनी राजेश विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.तो सुद्धा न्यायालयात नेहमीच गैर हजर राहत होता.त्याच्या विरुद्ध अटक वारंट जारी करण्यात आले होते.त्या पकडून आणण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेवर देण्यात आली होती.पोलिसांनी त्या पकडून आणल्यावर जिल्हा न्यायाधीश जगताप यांनी सध्या त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस हवालदार धोंडीराम केंद्रे आणि पोल्सी शिपाई ब्रम्हानंद लामतुरे यांनी या दोन्ही आरोपीना पकडण्यासाठी भरपूर मेहनत घेतली.अनेक अडचणींना सामोरे जात न्यायालयाचे आदेश अंमलात आणले.आपल्या दोन्ही पोलिसांचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी