रेल्वे अंडरब्रिज बनला मृत्यूचा सापळा..प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष


नागरिक रेल्वेरोको आंदोलन करण्याच्या तयारीत 
हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरातील उमरचौक पासून पार्डी, अन्देगाव, टेम्भी, एकघरी, वाशीकडे जाणार्या रेल्वे अंडर ब्रिज रस्त्याची अक्षरशा चाळणी झाली असून, बैलगाडी, दुचाकी वाहनातून ये - जा करणाऱ्या,  नागरीकातून रेल्वे प्रशासन व खासदार, आमदारांच्या नावाने बोटे मोडत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तात्काळ समस्या सुटली नाही तर या भागातील नागरिक रेल्वेरोको आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 

मराठवाडा - विदर्भ - तेलंगणा राज्यास जोडणाऱ्या हिमायतनगर जवळील रेल्वे अंडरब्रिज रस्ताचे काम गेल्याचा पाच वर्षी करण्यात आले होते. सदरचे काम करताना संबंधित गुत्तेदाराने अत्यंत निकृष्ठ पद्धतीने काम केल्यामुळे अल्पवाधीतच रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी गांधीगिरी करून स्वखर्चाने मुरूम टाकून खड्डे बुजविले होते. तसेच रेल्वे प्रशासन व राजकीय नेत्यांनाहि साकडे घातले. त्यानंतर रस्ता मंजूर झाला परंतु केवळ अर्धा कि.मी.चा सिमेंट रस्ता करून गुत्तेदाराने पलायन केले, परिणामी बाकी रस्त्याचे काम रखडले आहे. तेंव्हापासून या रस्त्याच्या दयनीय अवस्थेकडे रेल्वे प्रशासन व केंद्रात आवाज उठविणारे खासदार यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. आजघडीला या रस्त्याची अक्षरशा चाळणी झाली असून, गुडघाभर खड्डे पडल्याने चारचाकी वाहने नेताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर तीन चाकी वाहने व बैलगाडी हाकताना अक्षरशा बसलेल्याना रस्ता पार करेपर्यंत जीव मुठीत धरून रहावे लागत आहे. या रस्त्यावर ददरोज अनेक वाहने घसरून खाली पडून अनेकजण जखमी होत आहेत. तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत असल्याने या रस्त्याने जाणे जिकरीचे असल्याने लांब पल्ल्याच्या रस्त्याचा अवलंब करण्याची वेळ आली आहे. हिमायतनगर - पार्डी अंडरब्रिज रस्त्याने टेंभी, अन्देगाव, महादापूर, भूरकडी, पार्डी, वाशी, दरेसरसम, पवना, एकघरी यासह जवळपास 20 ते 25 गावासह तेलंगणा प्रदेशातील गावकर्यांना जावे लागते. आजवर या ठिकाणी अनेक मोठे अपघात झाले असून, याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या आधीकार्याना व खासदार महोदयांना सांगूनही तालुक्यातील सवना ज., पार्डी, खडकी बा, जवळगाव, कांडली येथील अंडरब्रिजच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. परंतु अद्यापायी याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने एखाद्या मोठ्या अपघाताची व पुढारी पाहत आहेत काय..? असा संतप्त सवाल रस्त्याला वैतागलेल्या जनतेतून विचारला जात आहे.

परंतु रस्ताच खराब झाल्याने दळन - वळणासाठी हिमायतनगर बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना कराव लागत आहे. पुलाखालून वाहने जाताना पाणी व खड्डेमय रस्त्याने वाहनांचे ताटे तुटणे, पलटी होणे, बंद पडन्याचे प्रकार घडत असल्याने नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिक, शेतकरी, वाहनधारकांमधून जबाबदार लोकप्रतिनिधीं व प्रशासनाच्या नावाने बोटे मोडन्याची वेळ आली असून, तात्काळ रस्त्याच्या समस्येकडे रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधीनि लक्ष द्यावे अन्यथा रेल्वेरोकोचा मार्ग अवलंबण्याच्या तयारीत असल्याचे नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी