नांदेड(प्रतिनिधी)हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील एका पतीने पत्नीच्या मानेवर कुर्हाडीचे घाव घालून निर्दयपणे खून करून स्वतः पोलीस स्थानकात हजार झाला होता. या आरोपावरून खुनी पतीस भोकरचे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एम. खान यांनी बुधवार दि.26 रोजी जन्मठेपेशी शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील
मौजे एकंबा येथील आरोपी कैलास विठ्ठल वाघमारे (वय ३३) याचे सुविद्य पत्नी कविता यांचा विवाह मरणाच्या15 वर्षांपूर्वी झाला होता. काही वर्ष संसार सुखात चालला त्यानंतर लहान - मोठ्या कारणाने नेहमीच दोघात किरकोळ भांडण होत होते. अनेकदा नातेवाईकांनी दोघांची समजूत काढून प्रेमाने राहण्याचे सांगितले होते. दरम्यान दि. 20 ऑगस्ट 2014 रोजी रात्रीला 8.30 ते 9 च्या दरम्यान दोघात कडाक्याचे भांडण झाले. याच रागाच्या भरात पती कैलास विठ्ठल वाघमारे वय 35 याने पत्नी कविताच्या डोक्यावर मानेच्या बाजूने जबरदस्त वार केला. कुर्हाडीच्या प्रहाराने कविता रक्तबंबाळ अवस्थेत पडली. याच अवस्थेत पत्नीला मरण्यासाठी तडफडत सोडून स्वतः आरोपी पतीने हिमायतनगर पोलिस स्थानक गाठले. एकंबा येथून तो पाई आल्यामुळे रात्री ११ वाजेच्या दरम्यान पोलिस स्थानकात हजर होऊन घडलेली घटना कथन करून मीच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. या बाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रेय कांबळे यांना समजताच तातडीने हिमायतनगर स्टेशनला भेट दिली. तसेच त्यांच्या आदेशाने दि.21 ऑगस्ट 2014 रोजी मध्यरात्री १.३० वाजता आरोपी कैलास वाघमारे याच्यावर कलम ३०२ खुनाचा गुन्हा करण्यात झाला आहे. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय कांबळे यांनी तपास करून आरोपीविरूद्ध भोकरच्या जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात पोलिसांचा घटनास्थळाचा तपासावरून भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे अँड.एस.आर. कस्तुरे यांनी काम पाहिले.