खर्या गरजू निराधारांना लाभ मिळवून देणार - आ. नागेश पाटील आष्टीकर
हिमायतनगर(प्रतिनिधी)खर्या गरजू निराधार लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी निराधार समिती सक्षम आहे. करिता लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव सर्व कागदपत्रासोबत सादर करावे. त्यावर विचार विनिमय होऊन सर्व निकषात बसणार्यांना शासनाच्या योजनेचा लाभ दिला जाईल असे ठोस आश्वासन हिमायतनगर निराधार समितीचे अध्यक्ष तथा हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी केले.
ते येथील तहसिल कार्यालयात दि.०२ बुधवारी घेण्यात आलेल्या निराधार समितीची पहिल्या बैठकी प्रसंगी लाभार्थ्यांना बोलत होते. यावेळी अनेक जेष्ठ नागरिकांनी राजीव गांधी, श्रावण बाळ, संजय गांधी आदी योजनेत बसणाऱ्या जवळपास २५० हून अधिक लाभार्थ्यांनी अापले प्रस्ताव दाखल केले. यावेळी दाखल झालेल्या प्रस्तावावर आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी स्वाक्षर्या केल्या. तसेच दाखल झालेल्या फाईलवर समिती अध्याक्ष यांनी बारकाईने नजर टाकून अनेक वयोवृद्ध नागरिकांना पगारीचा लाभ नक्की मिळवून देईल असे सांगितले. परंतु यापैकी किती लाभार्थी पत्र ठरले हे समजू शकले नाही. याप्रसंगी तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, राम ठाकरे, गजानन तुपत्तेवार, विशाल राठोड, शंकर पाटील, बालाजी राठोड, स्वीय्य सहाय्यक बंडू पाटील, विजय वळसे, विठ्ठल ठाकरे, किशनराव पाटील, माराेतराव साेनारीकर, सावण डाके, गणेशराव पाटील, रामराव पाटील, संजय काईतवाड, पवन करेवाड, राजू पाटील, परमेश्वर पानपटे, संतोष गाजेवार, साईनाथ धोबे, साै चंद्रकलाबाई गुडेटवार, इंगळे बाई यांच्यासह, निराधार योजनेचे काम पाहणारे सोनकांबळे, व इतर कर्मचारी व वयोवृद्ध लाभार्थी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आता तरी दलालांना चाप बसेल काय...?
--------------------
विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील शेकडो निराधार लाभार्थी नवीन प्रस्ताव दाखल करून तहसील कार्यालयाच्या चकरा मारून हैराण झाले आहेत. तर ज्यांना मानधन मिळते ते लाभार्थी दलालाच्या टक्केवारीमुळे त्रस्त झाले आहेत, उशिरा का होऊन निराधारांची बैठक बुधवारी झाली. गत काळात लाभ मिळत असलेल्या निराधार महिलांना आजही काही दलाल मासिक पगाराच्या वेळी आपले कमिशन काढून घेतात हे वास्तव अनेकांनी बोलून दाखविले. नव्याने पत्र ठरणाऱ्या खर्या व गरजू लाभार्थ्यांना न्याय मिळावा अशी रास्त अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. नवनिर्वाचित आ. आष्टीकर यांच्या काळात तरी निराधारांच्या पगारीवर डोळा ठेवणाऱ्या दलालांना चाप बसेल काय..? असा प्रश्न उपस्थित लाभार्थ्यांच्या चर्चेत समोर आला आहे.