विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

बहिणीची सोयरिक मोडल्याने भावाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
हिमायतनगर तालुक्यातील डोलारी येथील घटना 
नांदेड(प्रतिनिधी)हिमायतनगर तालुक्यातील मौजे डोलारी येथील एका तरुणाने बहिणीची सोयरिक मोडल्याचे दुख सहन न झाल्याने गावातीलच जुन्या सार्वजनिक विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपविली. हि र्हदयद्रावक घटना मंगळवार दि.१९ रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 


तालुक्यातील मौजे डोलारी येथील माधवराव कदम यांच्या मुलीची सोयरिक व रिती रिवाजाप्रमाणे साखरपुडा सिरपल्ली येथील भुजंगराव कदम यांचा मुलगा गोपीनाथ याच्याशी गतवर्षी थाटात संपन्न झाला. सग्या सोयर्‍यामध्ये ठरल्याप्रमाणे मुलीच्या आई- वडीलांनी सासरच्या मंडळीची सरबराई देणे- घेणे केले. यावर्षी लग्ण समारंभ उरकणार.... लग्णाची तारीख निघणार...बहिणीला मेहंदी लागणार.... या आपेक्षेने भावाने बहीणीच्या लग्णाची स्वप्ने सजवीली आणि ही स्वप्ने सत्यात साकारण्यासाठी सासरच्या मंडळीकडे नुकतेच गेले होते. मात्र येथे सासरच्या मंडळींनी मुलींच्या वडीलाकडे दोन लाखाच्या आगाऊ रक्कमेची मागणी केली. ती मागणी पुर्ण केल्याशीवाय लग्णाची तारीख काढणार नाही. अन्यथा हे लग्ण मोडण्यात येईल असे सांगताच बहीणीच्या लग्णाची स्वप्ने पाहणार्‍या सतीशचे संतुलन बिघडले. अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीत झालेली नापिकीने हैराण असताना आगाउचा हुंडा कसा द्यायचा या विवंचनेत कुटुंब सापडले होते. त्यात बहिणीची सोयरिक मोडल्याचे दुख सहन न झालेल्या मयत सतीश माधव कदम याने गावातीलच सार्वजिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 


हि घटना समजताच गावातील बघ्यांनी विहीर परिसरात तोबा गर्दी केली होती. तर नातेवाईकांनी मुलीच्या सासरच्या मंडळी विरुद्ध रोष व्यक्त करत शवविच्छेदन झाल्यानंतर गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होईपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला. तत्पूर्वी फिर्यादी किशन शेषेराव कदम यांनी दिल्यावरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी लक्षटवार हे करीत आहेत. रात्री उशिरा मयताच्या नातेवाईकांच्या मागणीवरून सिरपल्ली येथील सासरच्या विरोधात हुंडाबंदी असताना हुंद्यची मागणी व आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी