सरपंच लुम्दे अपात्र

हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे एकंबा येथील महिला सरपंच सौ.प्रभावती अवधूत लुम्दे यांनि नियमानुसार ग्रामसभा व मासिक सभा घेतल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, उपसरपंचच्या तक्रारीने दोन्ही बाजू तपासून महिला सरपंचास उर्वरित कालावधीसाठी पदावरून बडतर्फ करण्यात आले. असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांनी दिले.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, एकंबा येथील महिला सरपंच सौ.प्रभावती अवधूत लुम्दे यांनी सरपंच पदी कार्यरत झाल्यापासून उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना अंधारात ठेवून नियामनुसार ग्रामसभे व मासिक बैठका घेतल्या नाहीत. तसेच विकास कामाचे ठराव परस्पर घेवून मनमानी कारभार केला आहे. हि बाब अनेकदा वर्तमान पत्रातून प्रकाशित झालेय बातम्यातून समोर आली होती. हे प्रकार अति होत असल्याने गावातील विकास कामे निकृष्ठ होऊन ठप्प होत आहेत. त्यामुळे येथील उपसरपंच गंगाधर मेघाजी प्रेमालवाड यांनी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे विद्यमान सरपंचास बडतर्फ करावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली होती. या प्रकरणी वाडी - प्रतिवादी यांना नोटीस पाठवून आप आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. तसेच संबंधित ग्रामसेवकाकडून ग्रामसभा व मासिक सभा संचिका मागवून घेतली. यात दोघांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून ग्रामसेवकाने पाठविलेल्या संचिकेचे अवलोकन केले असता, सरपंचाने नियमानुसार ग्रामसभा व मासिक सभा घेतल्या नसल्याचे निदर्शनास आले.

त्यावरून अपार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एकंब्याच्या महिला सरपंच सौ.प्रभावती अवधूत लुम्दे यांना उर्वरित कालावधीसाठी सरपंच पदावरून कार्य करण्यास अपात्र घोषित केले. या प्रकरणात उपसरपंच गंगाधर मेघाजी प्रेमलवाड यांच्या वतीने एड.एन.जे.काकडे यांनी बाजू मांडली होती.

अपहर प्रकरणी पोलिस गुन्हा दाखल झाला होता
-------------------------------------------------
एकंबा येथील ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले विद्यमान सरपंचाने सत्ता हाती आल्यापासून तत्कालीन ग्रामसेवक राठोड यांच्याशी मिलीभगत करून तंटामुक्त भवन आणि समाज मंदिराच्या बांधकाम न करताच परस्पर निधी उचलून हातावर ठेवून मनमानी कारभार केला होता. त्या प्रकरणी त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जामीन मिळविण्यासाठी काही महिने त्या फरार होत्या. या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक सुखदेव राठोड यांनी उचल केलेली रक्कम खात्यात भरली. त्यानंतर हे प्रकरण अजूनही जैसे थेच असून, सदर ग्रामसेवक व सरपंच सहीसलामत कार्यरत आहेत. त्यांच्या गत कारभाराचा फटका पदावरून बडतर्फ झाल्याने बसला असे गावकर्यामधून बोलले जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी