शेतकर्याची आत्महत्या

नापिकीमुळे कर्जबाजारीमुळे शेतकर्याची आत्महत्या

हदगाव(शिवाजी देशमुख)नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून हदगाव तालुक्यातील्कोली येथील एका शेतकर्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हदगाव तालुक्यातील कोळी येथील शेतकरी माधवराव भगवानराव कदम वय ४५ वर्ष यांनी गतवर्षीच्या खरी हंगामात शेतात पिकांची पेरणी केली होती. मात्र जुलै - ऑगस्ट, महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व पिके वाहून गेली. त्यामुळे शेतकर्याने खरीप हंगामात केलेले खर्चही निघाला नाही. म्हणून शेतकऱ्याच्या डोक्याव्रील्कार्जाचा बोजा वाढला असून, आत या परीस्थित मुलीचे लग्न व घेतलले खर्च कसे फेडायचे या विवंचनेत नेहमीच असायचा. याच विवंचनेत असताना दि.२९ मे रोजी सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजेच्या दरम्यान विषारी औषध प्राशन केले. हि बाब घरच्यांच्या लक्षात येताच तातडीने त्यांना हदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या ठिकाणी उपचार कौन प्रकुती गंभीर बनल्याने नंदेच्या उगनालयात दाखल करण्यात आले होते. नांदेड येथे उपचार सुरु असताना अखेर शेतकर्याची प्राणज्योत मालवली. याबाबत हदगाव पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद कण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत मिळून द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.     

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी