अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास

अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतकर्यांनी उत्पन्न वाढीवर भर द्यावा.. आ.जवळगावकर



हिमायतनगर(अनिल मादसवार)शेतकर्यांनी कमी शेतीत अधिक उतपन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले. ते हिमायतनगर तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी वसंत कार्यक्रमाचे लाइव्ह टेलीकास्ट प्रसारणाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

नागपूर येथे कृषी वसंत या कृषी प्रदर्शनाचे दि.०९ ते १३ फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. यात शेतकर्यांना वेगवेगळी शेती अवजारे, ऒषधि वनस्पती, एकात्मिक पिक पद्धती, कीड व रोग नियंत्रण, जलसंधारण, मृदू संधारण, नियंत्रित शेती मधील हरित ग्रह शेड नेट, उस जातीच्या वाणाची माहिती, टिश्हु कल्चर, निर्यातीच्या सोयी सुविधा, ठिबक,तुषार सेवाबाबत माहिती,सर्व प्रकारची शेती व उपयोगी तसेच शेतीचा जोड धंदा करून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी होऊ शकते हे पाहण्याचा या प्रदर्शनात लाभ होणार आहे. कमी पाणी, कमी जमीन, व कमी खर्चात जास्त उत्पन व नगदी निवळ नफा, गटाच्या माध्यमातून झालेला आहे हे शिकत येणार आहे.

या प्रदर्शनास काही शेतकर्यांना नागपूर प्रदर्शनासाठी जावू न शकलेल्यासाठी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयात थेट प्रक्षेपनाद्वारे प्रदर्शन पाहता येणार आहे. तशी सोय तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. याचे उद्घाटन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर लाइव्ह टेलीकास्टचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावरून पुढे बोलताना ते म्हणाले कि, आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यानुषंगाने शासनाचा पढकर, परिसंवाद व चर्चासत्र, कृषी विषयक प्रात्याक्षिके, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, अंतर राष्ट्रीय तज्ञ प्रतिनिधींचा संवाद, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आदी वैशिष्ट्य पूर्ण कार्यक्रमाची रेलचेल या प्रदर्शन चालणार आहे. या प्रदर्शनास जावू न शकलेल्या शेतकर्यांनी येथील कार्यालयात लाइव्ह टेलीकास्टच्या माध्यमातून लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सुभाष राठोड, दत्तराम पाटील, दामोदर राठोड, वानखेडे, विकास पाटील, भवरे, हाथमोडे, माजळकर, लहाने, भिसे, शेतकरी, पत्रकार बांधव मोठ्या संखेने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका मंडळ कृषी अधिकारी श्री जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कृषी सुपरवायजर पवार यांनी केले.

कृषी प्रदर्शनास १५० शेतकरी रवाना ..
--------------------------------------
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी प्रदर्शन `वसंत कृषी नागपूर २०१४` या नावाने भरत आहे. प्रगती शेतकऱ्यांची , उन्नती देशाची हे ब्रीद घेवून कृषी प्रदर्शनाची सुरुवात दि. ९ फेब्रुवारी रोजी भारताचे महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभास्ते होणार आहे. सदरचे प्रदर्शन आत्तापर्यंतच्या कालावधीतील देशातील सर्वात मोठे व अत्याधुनिक राष्ट्रीय कृषी प्रदर्शन म्हणून ऒळखले जाणार आहे. या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी हिमायतनगर तालुक्यातून जवळपास १५० शेतकरी जाणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दावलबाजे यांनी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी