पल्‍स पोलिओ

पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

नांदेड(अनिल मादसवार)जिल्‍ह्यात 19 जानेवारी रोजी पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्‍यात आली या मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते सकाळी नांदेड तालुक्यातील निळा येथे करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पात्र बालकांना पल्स पोलिओची लस पाजविण्यात आली. या कार्यक्रमास खासदार भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने आदी मान्यवर उपस्थित होते.

सन 1995 पासुन पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दरवर्षी संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालके पोलिओ लसीद्वारे संरक्षित करणे हा मुख्य उद्देश आहे. गेली 18 वर्ष सातत्याने पोलिओ निर्मुलनाकरीता सर्वांच्‍या अथक परिश्रमामुळे व मोहिमेच्या सातत्यामुळे महाराष्ट्रात 13 जानेवारी 2011 पासून आजपर्यंत एकही पोलिओचा रुग्ण आढळून आलेला नाही. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन ही मोहिम यशस्‍वी करण्‍याचे आवाहन पालकमंत्री सावंत यांनी यावेळी केले.

या मोहिमेसाठी 3 लाख 95 हजार 252 अपेक्षित लाभार्थी आहेत. 2 हजार 616 बुथ केंद्र संख्‍या आहे. उपलब्‍ध मनुष्यबळ 6 हजार 876 आहे. स्थापन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या टिमची संख्या एकूण 2 हजार 211 आहे. मोहिमेसाठी लागणारी लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सत्रासाठी लागणारी 5 लाख 13 हजार 602 लस (डोसेस) चा पूरवठा प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍तरावर करण्यात आलेला आहे. या दृष्टीने नियमित लसीकरण कार्यक्रमाचे बळकटीकरण करण्यासाठी या मोहिमेसोबतच नियमित लसीकरण, ए. एफ. पी सर्वेक्षण व पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्‍यात येत आहे.

या कार्यक्रमास नांदेड पंचायत समितीचे सभापती बंडु पावडे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कोमवाड, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पावडे, ॲड निलेश पावडे, प्रफुल्ल सावंत, गणपतराव मोरगे, सरपंच संभाजीराव जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी