सांस्कृतिक तथा टैलेन्ट सर्च कार्यक्रमात चिमुकल्यांचा सहभाग
हिमायतनगर(प्रतिनिधी)येथील श्री परमेश्वर मंगल कार्यालयात दि.१९ रोजी पार पडलेल्या सांस्कृतिक तथा टैलेन्ट सर्च कार्यक्रमात चिमुकल्यां मुला -मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेवून आपल्या अंगी असलेल्या कला -गुणांचे दर्शन घडवून आणले आहे. सदर कार्यक्रम येथील ज्ञानदीप कोचिंग क्लासेसच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता येथील सरपंच श्रीमती गंगाबाई शेषेराव शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून करण्यात आली. यावेळी मंचावर हुजपाच्या मुख्याध्यापिका सौ. लाठे, प्रा.सूर्यप्रकाश जाधव, ग्राम पंचायत सदस्य हनुमानसिंग ठाकूर, कदम सर, पत्रकार अनिल मादसवार यांची उपस्थिती होती. ऊदघाटनानंतर शालेय विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या खावूच्या साहित्याचे स्टोल लावण्यात येवून आनंद मेळाव्यात खरी कमाईचा आनंदचा अनुभव बालकांनी घेतला. यावेळी मान्यवरांनी सुद्धा चिमुकल्यांनी विक्रीस आणलेल्या खाद्य पदार्थ चाखून बालकांचा उत्साह वाढविला. दुसऱ्या सत्रात येथील सभागृहात शालेय विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा संपन्न झाली. यात विद्यार्थ्यांनी मी शेतकरी बोलतोय, मी सावित्रीबाई फुले बोलतेय या विषयावर परखड अशी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर दुपारच्या सत्रात त्यांच्या अंगी असलेली कला - गुणांची तसेच उत्साह वाढविण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, व सध्यच्या घडामोडीवर आधारित नाटिका, गीते सदर केले. यावेळी अनिल भोरे, मारोती हेंद्रे, गजानन चायल, रामदास रामदिनवार, कराळे सर, ठाकूर सर, जाधव सर, अनिल भोरे, अमोल कोटूरवार यांच्यासह महिला - पुरुष पालक, विद्यार्थी, नागरिक बहुसंखेणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश कोथळकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लासेसचे, शिरफुले, हरडपकर आदींसह विद्यार्थी - विद्यर्थिनिनि परिश्रम घेतले.