पारितोषिकाने सन्मान

मुंबईतील फोटोफ़ेअर २०१४ च्या कार्यक्रमात 
श्री राघवेंद्र कट्टी यांचा उत्कृष्ठ प्रशिक्षक पारितोषिकाने सन्मान 


नांदेड(अनिल मादसवार)मुंबई येथे नुकतेच संपन्न झालेल्या फोटोफ़ेअर २०१४ च्या कार्यक्रमात नांदेडचे छायाचित्रकार तथा प्रशिक्षक श्री राघवेंद्र कट्टी यांना उत्कृष्ठ प्रशिक्षक पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षी पहिल्यांदाच राष्ट्रीयस्तरावर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, या पुरस्काराचे पहिले मानकरी नांदेडचे कट्टीसर ठरल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

दि.१० जानेवारी ते १३ जानेवारी या तीन दिवसीय फोटोफ़ेअर २०१४ च्या कार्यक्रमाचे आयोजन बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे सभाग्रहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात देश -विदेशातून लाखोच्या संखेने छायाचित्रकार व हौशी नागरिक व मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. याचा कार्यक्रमात नांदेडचे राघवेंद्र कट्टी यांना फोटोग्राफी क्षेत्रातील उत्कृष्ठ प्रशिक्षक २०१३ च्या पुरस्काराने डीजी फ्लिक या इंटरनैशनल फोटोग्राफी सोफ्टवेअर कंपनीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी कोडैक कंपनीचे नैशनल बिझिनेस मैनेजर पी. रघुवीर, एस.आर.के.इमेजिंग चे सी.ई.ओ.श्री कीर्तीभाई, डीजी फ्लिकचे श्री प्रसाद परुळेकर, सिम्बोसिस स्कूल फोटोग्राफीचे डायरेक्टर श्री. विशाल भेंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

श्री कट्टी यांनी मागील १५ वर्षापासून महाराष्ट्रात फोटोग्राफी क्षेत्रात नवनवीन प्रयोग व प्रशिक्षण कार्यशाळा घेवून अनेक छायाचित्रकारान घडविले आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेवून हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आल्याने नांदेड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय  स्तरावर पोहोंचले आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल नांदेड जिल्हा फोटोग्राफर असोशियांचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, सचिव सुशांत आष्तूरकर, सिटी मैकसचे दिलीप माहुरे, सुनील कामीनवार, नाना रामटेक यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी