कर्तव्याची उदासीनता ही मानवी हक्कातील विसंगती - देवदत्त तुंगार
नांदेड(अनिल मादसवार)मानवी हक्कात भावनेपेक्षा न्यायीक विचाराला अधिक महत्व आहे. कोणत्याही धर्मग्रंथांमध्ये अनिष्ठ आणि अन्यायी रुढींना पाठिंबा दिलेला नाही. परंतु काही लोकांनी स्वत:ची काही मते घुसवून विकृतीच्या स्वरुपात मांडली. त्यामुळे आज मानवी हक्काचे हनन होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर असतात. त्याकरिता हा विषय शालेय पाठ्यक्रम आणि विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाच्या स्वरुपात समाविष्ट व्हावा, अशी अपेक्षा माजी प्राचार्य व ज्येष्ठ पत्रकार देवदत्त तुंगार यांनी व्यक्त केली.. .......