संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष देवसरकर यांची गाडी फोडली , संभाजी ब्रिगेड वर्सेस काँग्रेसचे शीतयुद्ध सुरु...
नांदेड(अनिल मादसवार)मराठा आरक्षणासाठी बुधवारी संध्याकाळी अज्ञात लोकांनी आ.माधवराव जवळगावकर यांची गाडी फोडल्या नंतर त्यांना प्रत्त्युत्तर म्हणून आमदारांच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष माधव देवसरकर यांची एम.एच. २६ व्ही ३१३१ या कारवर दगडफेक करून तोडफोड केली असून, यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड वर्सेस काँग्रेसचे शीतयुद्ध सुरु झाल्याचे बोलले जात आहे. ..........