जोशीसांगवी येथे सहावी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न -NNL


उस्माननगर, माणिक भिसे|
कापसी बु.केद्रातंर्गत येणाऱ्या जोशीसांगवी ता. लोहा येथील श्री बाळ ब्रम्हचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालयात दि.३०,नोव्हेंबर रोजी केद्रस्तरीय सहावी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. 

या परिषदेचे अध्यक्षस्थानी, केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक श्री बेरळीकर  तर प्रमुख पाहूणे म्हणून या शाळेचे मुख्याध्यापक श्री गायकवाड गोविंदा  हे होते.शिक्षण परिषदेसाठी केंद्र व केंद्रांतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनाचे व खाजगी शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका यांची पूर्ण वेळ उपस्थिती होती.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रस्तुत शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात स्वागत गीताने व शब्दसुमनाने उपस्थितीताचे स्वागत केले. केंद्रप्रमुख श्री बेरळीकर यांनी प्रास्ताविकात शिक्षण परिषद आयोजित करण्याचा उद्देश सांगितला. शाळेचे मुख्याध्यापक  गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत करून शाळेची यशोगाथा  सांगत शिक्षण परिषदेविषयी सखोल मार्गदर्शन करत जिल्हा परिषद शिक्षकांचे कौतुक केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोशी सांगवी येथील सर्वगुणसंपन्न शिक्षक मन्मथ डांगे यांनी निपुण भारत अंतर्गत माता, पालक गटाच्या प्रभावी बैठक आयोजित करण्याविषयी माहिती दिली. तसेच सौ. वाईकर मॅडम व रमाकांत तुबंरफळे  यांनी आदर्श पाठ सादर केले. केंद्रप्रमुख श्री बेरळीकर यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या प्रशासकीय कामाचा आढावा घेऊन वरिष्ठ कार्यालयांच्या सर्व सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या. तसेच अहवालाचे  संकलन करण्यात आले .सर्वात शेवटी आजच्या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचे आभार मानून शिक्षण परिषद समाप्त झाल्याचे जाहीर केले.या यावेळी प्रस्तुत शाळेतील शिक्षक वडवळे , कोकतरे उपस्थित होते शिक्षण परिषद कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन श्री मन्मथ डांगे यांनी केले. ही शिक्षण  परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी यांनी परिश्रम  घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी